Smartphones Tips : तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपतेय? मग, फाॅलो करा 'या' काही टिप्स
सध्या मोबाईल फोनचा वापर करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र अनेकदा मोक्याच्या वेळी मोबाईलची बॅटरी लगेच संपते.
How to Increase Smartphone Battery Life : सध्या मोबाईल फोनचा वापर अनेक जण सर्रास करताना दिसतात. आॅफिसच्या कामापासून ते अगदी किराणा सामान मागवण्यापर्यंत आपण आता सर्वकाही फोनच्या मदतीने करतो. इतकेच काय तर मनोरंजनासाठी आपण फोनचा वापर करतो. मात्र हे सगळे करत असताना अचानक आपला फोनमध्येच बंद पडतो.अनेकदा फोनला पूर्ण चार्जिंग केले तरीही फोनची बॅटरी लवकर संपते. तुमच्यासोबतही असेच काही घडत असेल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही तुमच्या फोनची बॅटरी वाचवू शकता आणि तुमच्या फोनची बॅटरीही (Battery) जास्त काळ टिकू शकते.
लाईव्ह वॉलपेपर लावू नका
जर तुम्हाला तुमच्या फोनची बॅटरी जास्त काळ टिकायची असेल तर लाईव्ह वॉलपेपर कधीही वापरू नका. लाईव्ह वाॅलपेपरमुळे सपूर्ण वेळ तुमच्या फोनची स्क्रिन सुरू राहते. लाइव्ह वॉलपेपर बंद ठेवल्याने तुमच्या फोनची बॅटरी बर्याच प्रमाणात वाचते.
फोनचा ब्राईटनेस कमी ठेवा
फोनचा ब्राईटनेस तुम्ही जर जास्त ठेवत असाल तर ते करणे पहिल्यांदा बंद करा. ब्राईट स्क्रिनमुळे फोनची बॅटरी मोठ्या प्रमाणात वापरली जाते.रात्रीच्या वेळी फोनची बॅटरी टिकवण्याकरता तुम्ही तुमच्या फोनला आय कम्फर्ट मोडवर टाकू शकता.
नेहमी चालू असलेला डिस्प्ले बंद ठेवा
फोनच्या डिस्प्लेमुळे देखील बॅटरी मोठ्या प्रमाणात खर्च होते.यासाठी शक्य असेल त्यावेळी फोनचा डिसप्ले बंद ठेवण्याचा प्रयत्न करा.सोबतच तुम्ही तुमचा फोन पॉवर सेव्हिंग मोडवर देखील ठेऊ शकता.
लोकेशन आणि ब्लूटूथ बंद ठेवा
अनेक वेळा घाईगडबडीत आपल्या कडून फोनमधील लोकेशन किंवा ब्लूटूथ चालू राहते.अशा अॅप्समुळे देखील फोनची बॅटरी खूप लवकर संपते.आवश्यक असेल तेव्हाच तुम्ही ब्लूटूथ आणि लोकेशन सुरू करा.तसेच फोनच्या क्विक ऍक्सेस पॅनलवरून तुम्ही ते कधीही चालू किंवा बंद करू शकता.
बॅकग्राउंड अॅप्स बंद करा
बॅकग्राउंडमध्ये सुरू असणारे सर्व अॅप्स तुम्ही बंद करणे गरजेचे आहे.जेणेकरून तुमच्या फोनची बॅटरी टिकून राहण्यास मदत होईल.ज्या अॅपचा वापर करून झालेला आहे असे अॅप्स बॅकग्राउंडमध्ये तसेच ठेवण्याऐवजी ते लगेच बंद करून टाका.
इतर महत्वाच्या बातम्या
Amazon Prime Day Sale : फक्त स्मार्टफोनच नाही तर या लॅपटॉपवरही मिळत आहेत भरघोस सूट