Tim Cook On Screen Time : पालकांनी आपल्या पाल्यांचा स्क्रीन टाईम कमी करायला हवा : टीम कुक
Tim Cook On Screen Time : अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी पालकांनी आपल्या मुलांना मोबाईल स्क्रीन टाईम कमी करायला हवा, असा सल्ला दिला आहे.
Tim Cook On Screen Time : मोबाईल कंपन्यांनमधील आघाडीची कंपनी असलेल्या अॅपलच्या सीईओकडून (Apple CEO) पालक आणि बालकांसाठी एक मोलाचा सल्ला दिला आहे. अॅपलचे सीईओ टिम कुक (Tim Cook) यांनी पालकांनी आपल्या मुलांना मोबाईल स्क्रीन टाईम कमी (Reduce Screen Time) करायला हवा, असा सल्ला दिला आहे. सध्याची मुले डिजिटल युगातील आहेत. तरीही त्यांच्या स्क्रीन टाईमबाबत कठोर भूमिका घ्यायला हवी, असे एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखती सांगितले आहे. तसेच त्यांची दिवसाची सुरुवात पहाटेच्या 5 वाजता कंपनीबद्दल लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया अत्यंत लक्षपूर्वक वाचून होत असते. तसेच अॅपलच्या उत्पादन आणि तंत्रामुळे लोकांचे आयुष्य समृद्ध होत असल्याचे पाहून आनंद वाटतो, असेही टिम कुक यांनी सांगितले आहे.
टेक्नॉलॉजी आणि मोबाईल कंपन्यांधील आघाडीची कंपनी अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी पालकांना मोलाचा सल्ला देताना मुलांचा डिजिटल स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी कठोर भूमिका घ्यायाल हवी. सध्याची मुले डिजिटल युगातील असल्यामुळे ही कठोर भूमिका महत्वाची असल्याचे त्यांनी पालकांना उद्देशून सांगितले आहे. माझा तरुण मुलगा स्मार्टफोनच्या आहारी गेल्याचं एका पत्रकाराने सांगितलं, त्यावर उत्तर देताना टिम कुक यांनी वरील उत्तर दिलं. त्यामुळे टिम कुक यांच्या सल्ल्याचे गांभीर्य अधिक वाढते.
लोकांचे जीवन समृद्ध करण्यासाठी टेक्नॉलॉजी
टेक्नॉलॉजीमुळे लोकांचे आयुष्य समृद्ध झाले पाहिजे. याबाबतीत आमच्या कंपनीला ग्राहकांच्या फिडबॅकचा चांगला उपयोग होतो. आम्ही तंत्रज्ञान विकसित करतो, उत्पादन बनवतो, जेणेकरुन लोकांना क्रिएटिव्ह विचार करता येईल, ते सक्षम बनतील. ज्या गोष्टी त्यांनी कधी केल्या नाहीत त्या करायाला प्रोत्साहित करतो, असे टिम कूक यांनी सांगितले आहे.
डिजिटल स्क्रीन टाईम कमी करण्याचा सल्ला
सध्याची मुलांमध्ये मोबाईल फोन वापराचे प्रमाण फार वाढले आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन पालकांनी आपल्या मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी. सध्याची मुले डिजिटल युगातील आहेत. हे लक्षात घेऊन ही कठोर भूमिका असावी, असा त्यांनी पालकांना मोलाचा सल्ला दिला आहे. स्मार्टफोनचा मुलांनी किती व कसा उपयोग करायला पाहिजे. तसेच मोबाईलवरील स्क्रीन टाईम ट्रॅक करण्यासाठी वेळ सेट करता यावी, यासाठी पालकांनी मोबाईल डिव्हाईस, कंटेट आणि डाऊनलोड्सवर लिमिटेशन्स पाहिजे. यावर भविष्यात पालकांना अॅपलच्या स्मार्टफोनरुन ट्रॅकिंग करता येण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे, असे टिम कुक यांनी पालकांना सांगितले. भविष्यात अॅपलच्या युजर्सचा स्क्रीन टाईम ट्र्रॅक केला जाईल. यामध्ये अॅपलच्या सर्व डिव्हाईस समावेश असणार आहे. त्यासाठी डिव्हाईसला अॅपलचा आयडी जोडलेला असणार आहे.
भविष्यात इंटरनेट नसताना इमर्जन्सी कॉल करता येणार
अॅपलच्या प्रॉडक्टवर लोकांनी दिलेल्या फीडबॅकवर आमचा पूर्ण विश्वास असून त्यामुळे अॅपलच्या टेक्नॉलॉची आणि प्रॉडक्ट बनवताना सकारात्मक बदल करुन विक्रीसाठी उपलब्ध केले जातात. भविष्यात अॅपलच्या ग्राहकांना संकाटाच्या काळात इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसतानाही आयफोनवरुन एमर्जन्सी कॉल करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. यासाठी डिव्हाईला थेट सेटलाईट्सशी जोडण्यात येईल, असंही टिम कुक यांनी सांगितले आहे.
दरम्यान, अॅपलने नुकतच भारतातील पहिले अॅपल स्टोअर फक्त मुंबईत लाँच केले जाईल, असे घोषित केले होते. हे रिटेल स्टोअर मुंबईतील काळी-पिवळी टॅक्सी यापासून प्रेरित असल्याचे अॅपलने त्यांच्या स्टेटमेंटमध्ये सांगितले आहे.
हेही वाचा