उद्या तीन जबरदस्त स्मार्टफोन होणार लॉन्च, घरी बसल्या पाहा सॅमसंगचा लॉन्च इव्हेंट
Samsung Galaxy Unpacked 2023: कोरियन कंपनी सॅमसंगचा उद्या मोठा इव्हेंट होणार आहे. ज्याला कंपनीने 'सॅमसंग अनपॅक्ड इव्हेंट 2023' असे नाव दिले आहे.
Samsung Galaxy Unpacked 2023: कोरियन कंपनी सॅमसंगचा उद्या मोठा इव्हेंट होणार आहे. ज्याला कंपनीने 'सॅमसंग अनपॅक्ड इव्हेंट 2023' असे नाव दिले आहे. कंपनी या कार्यक्रमात Galaxy S23 सीरीज सादर करेल. या अंतर्गत कंपनी Samsung Galaxy S23, Galaxy S23 Plus आणि Galaxy S23 Ultra लॉन्च करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी या इव्हेंटमध्ये अपडेटेड डिझाइनसह नेक्स्ट जनरेशन गॅलेक्सी नोटबुक्सही सादर करू शकते. या बातमीत आपण सॅमसंगचा हा मोठा कार्यक्रम तुम्ही घरी बसून कसा पाहू शकाल, हे जाणून घेऊ...
असा प्रकारे पाहता येईल इव्हेंट
तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून Samsung Galaxy S23 इव्हेंट पाहू शकता. येथे या इव्हेंटचं थेट प्रक्षेपण येथे केले जाईल. याशिवाय कंपनीच्या ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूबवर तुम्ही घरबसल्या हे लाईव्ह इव्हेंट्स पाहू शकता. उद्या म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 11.30 पासून हा इव्हेंट सुरू होईल.
S23 सीरीजमधील स्पेसीफिक्सेशन
Samsung Galaxy S23 सिरीजमध्ये तुम्हाला Snapdragon 8 Generation 2 प्रोसेसरचा सपोर्ट मिळेल. तुम्हाला Samsung Galaxy S23 आणि S23 Plus मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप पाहायला मिळेल. तसेच या सीरीजच्या टॉप-एंड व्हेरिएंटबद्दल म्हणजे Samsung Galaxy Ultra बद्दल सांगितले जात आहे की, यात 200-मेगापिक्सेल कॅमेरा मिळू शकतो. Samsung Galaxy S23 आणि S23 Plus 8GB RAM आणि 128GB अंतर्गत स्टोरेजसह येतील तर अल्ट्रा 12GB RAM आणि 256GB अंतर्गत स्टोरेजसह येईल.
किंमत
Samsung Galaxy अर्थात S23 च्या बेस मॉडेलबद्दल बोलायचे झाले तर याची किंमत जवळपास 80,000 रुपये असू शकते. तर S23 Plus ची किंमत जवळपास 90,000 रुपये आणि S23 Ultra ची किंमत जवळपास 1,15,000 रुपये असू शकते. मोबाईल फोन लॉन्च झाल्यानंतरच नेमकी माहिती समोर येईल.
OnePlus हे 2 स्मार्टफोन लॉन्च करणार
चिनी मोबाईल फोन निर्माता वनप्लस 7 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. यामध्ये OnePlus 11 5G आणि OnePlus 11R चा समावेश आहे. OnePlus 11 5G मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल, ज्यामध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 40 मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आणि 32 मेगापिक्सेलचा तिसरा कॅमेरा असेल. तर फ्रंटमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सेल कॅमेरा असेल. OnePlus 11 5G ची किंमत 55,000 रुपयांपासून सुरू होईल तर OnePlus 11R ची किंमत सुमारे 45,000 रुपये असू शकते.