एक्स्प्लोर

Threads New Feature : थ्रेड्स युजर्ससाठी खुशखबर! आता इंस्टाग्राम डिलीट न करताही अकाउंट डिलीट करू येणार, 'डिलीशन' फीचरमुळे चिंता मिटणार

Threads New Feature : थ्रेड्स ॲपने युजर्ससाठी नवीन फिचर (Threads Deletion Feature) आणणार आहे. यामुळे आता इंस्टाग्राम डिलीट न करताही अकाउंट डिलीट करू येणार आहे.

मुंबई : मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म (Microblogging Platform) थ्रेड्स (Threads) वापरणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. आता थ्रेड्स युजर्सची (Threads User) मोठी समस्या दूर होणार आहे. थ्रेड्सची मालकी कंपनी मेटा (Meta) सध्या नवीन फिचर (Threads New Feature) वर काम करत आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही इंस्टाग्राम डिलीट (Instagram Account Delete) न करताही थ्रेड्स अकाऊंट (Threads Account Delete) सहजपणे डिलीट करता येणार आहे. थ्रेड्स ॲप लाँच झाल्यापासून यूजर्स थ्रेड्समध्ये या फीचरची मागणी करत आहेत. सोशल मीडिया अ‍ॅप इंस्टाग्रामच्या टीमनेच थ्रेड्स विकसित केलं आहे. याची मालकी मेटा कंपनीकडे आहे. 

थ्रेड्स युजर्ससाठी चांगली बातमी

थ्रेड्स लाँच झाल्यापासून या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये युजर्ससाठी अनेक नवनवीन फिचर्स जोडले आहेत. थ्रेड अकाऊंट हटवण्यात सर्वात मोठी समस्या येत होती. आता मेटा लवकरच ही समस्या सोडवणार आहे. खातं हटविण्यासाठी नवीन फिचर आणणार असून तुम्ही थ्रेड्स अकाऊंट सहजपणे हटवू शकाल. थ्रेड्स (Threads) ॲप इंस्टाग्रामशी (Instagram) जोडलेलं असल्यामुळे दोघांची सेटिंग्ज सारखीच आहेत, ही ॲपच्या बाबतीत यूजर्ससाठी एक मोठी चिंतेची आहे. याचं निरसन करणार आहे.

इंस्टाग्राम डिलीट न करताही अकाउंट डिलीट करता येणार

थ्रेड्स अकाऊंट डिलीट करण्याबाबत काही मर्यादा आहेत. एकदा तुम्ही थ्रेड्सवर अकाऊंट सुरु केल्यावर तुम्हांला ते हटवता म्हणजे डिलीट करण्याचा पर्याय नाही. कारण, थ्रेड्स प्रोफाइल तयार केल्यावर त्यासोबत तुमचं इंस्टाग्राम अकाऊंट लिंक होतं. त्यामुळे तुम्ही थ्रेड प्रोफाइल निष्क्रिय (Threads Profile Deactivate) करता येऊ शकता. पण, तुम्ही तुमचं इंस्टाग्राम अकाऊंट डिलीट केल्यानंतर तुमचे थ्रेड प्रोफाइल डिलीट होतं. यामुळे युजर्सकडून अकाऊंट डिलीट करण्यासाठी वेगळ्या फिचरची मागणी करण्यात येत होती. मात्र, आता थ्रेड्सने यावर उपाय शोधला आहे.

'डिलीशन' फीचरवर काम 

टेक क्रंचच्या रिपोर्टनुसार, मेटाच्या चीफ प्रायव्हसी ऑफिसरने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी थ्रेड्समधील अकाउंट 'डिलीशन' (Deletion) या फीचरवर काम करत आहे. डिसेंबरमध्ये हे फीचर (Threads Deletion Feature) यूजर्ससाठी आणले जाऊ शकते. इंस्टाग्राम आणि थ्रेड्स अकाऊंट एकमेकांशी जोडलेलं असल्याने थ्रेड्स अकाऊंट हटवल्यास इंस्टाग्राम अकाऊंट आपोआप हटवलं जातं. यामुळे कंपनीवर जोरदार टीका झाली, त्यामुळे आता कंपनी यामध्ये सुधारणा करत आहे. 

लवकरच थ्रेड्स पोस्ट एडिटही करता येणार

अकाऊंट डिलीट करण्यासाठीच्या फीचरसोबतच मेटा कंपनी थ्रेड्स युजर्ससाठी आणखी एक भन्नाट फीचर आणणार आहे. लवकरच थ्रेड्स युजर्स शेअर केलेल्या पोस्ट संपादित (Edit) म्हणजेच एडिटही (Thread Post Edit Feature) करू शकतील. अलीकडेच कंपनीने यासंदर्भात माहिती दिली आहे. सुरुवातीला कंपनीने शेअर पोस्ट एडिट करण्यासाठीची वेळ मर्यादा फारच कमी ठेवली आहे. लवकरच हे फिचर येणार आहे. या फिचरमुळे युजर्स पोस्ट शेअर केल्यानंतर 5 मिनिटांपर्यंत पोस्ट एडिट करू शकतील.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaZero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget