Tesla Optimus Robot : Elon Musk यांनी शेअर चालत्या-फिरत्या रोबोटचा व्हिडीओ, नेटकरी म्हणतात 'Just Looking like A wow'
Tesla Optimus Robot : टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ऑप्टिमस माणसाप्रमाणे चालताना दिसत आहे.

Tesla Optimus Robot : इलॉन मस्क (Elon Musk ) नुकताच आपल्या रोबोट ऑप्टिमसमुळे सोशल मीडियावर (Social Media) खूप चर्चेत आला आहे. आधी त्यांनी ऑप्टिमसला शर्ट फोल्ड करताना दाखवले होते आणि आता त्यांनी आता पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये ऑप्टिमस माणसाप्रमाणे चालताना दिसत आहे. ऑप्टिमसची निर्मिती करणाऱ्या टेस्ला कंपनीचे सीईओ मस्क यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करताना ऑप्टिमससोबत फिरायला जातोय, असं लिहिलं आहे. सध्या या व्हिडीओची चांगलीच चर्चा सुरु आहे.
व्हिडिओमध्ये रोबोट एका सरळ रेषेत फिरताना दिसत आहे. एखाद्या प्रकारच्या कारखान्यासारख्या दिसणाऱ्या इमारतीत हे सुरू आहे. रोबोटच्या हालचाली अगदी माणसाप्रमाणे दिसत आहेत. तो पावलंदेखील माणसासारखे टाकताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
शर्ट फोल्ड करू शकतो
इलॉन मस्क यांनी टेस्लाच्या नव्या ह्युमनॉइड रोबोटबद्दल सर्वांना आश्चर्यचकित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी एका फॅक्टरीत काम करणाऱ्या टेस्ला रोबोटचा व्हिडिओ शेअर केला होता. या क्लिपमध्ये रोबोट एका बादलीतून काळ्या रंगाचा टी-शर्ट उचलून सहजतेने फोल्ड करताना दिसत आहे. 'ऑप्टिमस फोल्ड्स शर्ट', असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं होतं.
अंडी हाताळणे, चालणं... सगळी कामं करणारा रोबोट?
डिसेंबरमध्ये मस्क यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात ऑप्टिमस रोबोट अंडी हाताळणे, चालणे आणि नृत्य करणे यासारखी ृ कामे करताना दिसला होता. टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये आपल्या ह्युमनॉइड रोबोटचा प्रोटोटाइप तयार केला होता. ऑप्टिमस आपल्या टेस्ला कारच्या ऑटोपायलट ड्रायव्हर फिचर्ससोबत काही एआय सॉफ्टवेअर आणि सेन्सरदेखील काम करेल, असं म्हटलं जात आहे.
सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस
हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने हा रॉट एडिट करून जो बायडन यांचा चेहरा लावला आहे. त्याचबरोबर या रोबोटची तुलना एलन मस्क यांच्याशी केली आहे. तर कोणीतरी हा रोबोटिक व्हिडिओ शेअर करत औशाम लिहिलं. अशा तऱ्हेने युजर्स या व्हिडिओवर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्हायरल होत आहे. याआधी एलन मस्क यांनी आणखी एक ऑप्टिमस ह्युमनॉइड रोबोट शेअर केला होता. त्यावरदेखील नेटकऱ्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या होत्या.
Going for a walk with Optimus pic.twitter.com/6mLJCUp30F
— Elon Musk (@elonmusk) January 31, 2024
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
