एक्स्प्लोर

OnePlus Nord N30 SE : वनप्लसने लाँच केला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन; मिळणार 5000 एमएएच बॅटरी आणि 50 मेगापिक्सेल कॅमेरा

OnePlus Nord N30 SE : वनप्लसने OnePlus  एक स्वस्त स्मार्टफोन लाँच केला आहे. OnePlus Nord N30 SE असे या स्मार्टफोनचे नाव असून कंपनीने बजेट रेंजमध्ये लाँच (Smartphone) केले आहे.

OnePlus Nord N30 SE : वनप्लसने OnePlus  एक स्वस्त स्मार्टफोन लाँच केला आहे. OnePlus Nord N30 SE असे या स्मार्टफोनचे नाव असून कंपनीने बजेट रेंजमध्ये लाँच (Smartphone) केले आहे. वनप्लसचा हा फोन OnePlus Nord N20  एसईचे अपग्रेड व्हर्जन आहे. वनप्लसच्या या नव्या फोनमध्ये नेमके कोणते फिचर्स दिलेले आहे. या फोनचा कॅमेरा कसा आहे?, पाहूयात...

वनप्लसच्या नव्या फोनचे स्पेसिफिकेशन्स

OnePlus Nord N30 SE ला वनप्लसच्या वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला आहे. OnePlus Nord N30 SE 5G मध्ये एफएचडी+ रिझोल्यूशनसह 6.72 इंचाचा पंच-होल कटआऊट एलसीडी डिस्प्ले आहे. फोनच्या बॅक पॅनेलवर कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000 एमएएच ची बॅटरी आहे जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 14 वर चालतो आणि ऑक्सिजनओएस 13.1 वर आहे.

कॅमेरा सेटअपसाठी OnePlus Nord N30 SE मध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ लेन्स देण्यात आला आहे. फ्रंटमध्ये 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेंसिटी 6020 प्रोसेसर  आहे. या स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे.

नव्या फोनची किंमत

वनप्लसने हा फोन केवळ एका व्हेरियंटमध्ये सादर केला आहे, जो 4GB RAM आणि 128GB   स्टोरेजसह येतो. हा फोन सध्या फक्त युएईमध्ये लाँच करण्यात आला आहे, जिथे त्याची किंमत 13,600 रुपये आहे. हा फोन युएईच्या शॉपिंग वेबसाइट noon.com वर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.  कंपनीने आपला नवा स्मार्टफोन सॅटिन ब्लॅक आणि सायन स्पार्कल या दोन रंगांमध्ये लाँच केला आहे. कंपनीने वनप्लसच्या ग्लोबल वेबसाईटवरही या फोनची लिस्टिंग केली आहे, पण भारतात लाँच करण्याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

OnePlus 12 वर डिस्काऊंट 

काही दिवसांपूर्वी लाँच करण्यात आलेल्या OnePlus 12 वर डिस्काऊंट मिळत आहे.  भारतीय बाजारात OnePlus 12 ची सुरुवातीची किंमत त्याच्या 12GB रॅम आणि 256GB व्हेरिएंटसाठी 64,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 69,999 रुपये आहे. तुम्हाला ICICI बँक कार्ड किंवा OneCard क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 2 हजार रुपयांची झटपट सूट मिळेल. जर तुमच्याकडे जुना स्मार्टफोन असेल, तर वनप्लस 12 घेताना तुम्हाला मोठं डिस्काउंट मिळू शकतं. मात्र, याबाबत कंपनीनं एक अट घातली आहे. तुम्ही बँक ऑफर आणि एक्सचेंज डिस्काउंटमध्ये केवळ एकच ऑफर घेऊ शकणार आहात. OnePlus 12 सिल्की ब्लॅक आणि फ्लोई एमरल्ड अशा दोन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध होणार आहे.

इतर महत्वाची बातमी-

Fast Mobile Charge Hacks : फास्ट मोबाईल चार्जिंगसाठी फॉलो करा 'या' ट्रिक्स; झटक्यात चार्ज होईल मोबाईल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 

व्हिडीओ

Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
Embed widget