एक्स्प्लोर

e-SIM Card : तुम्ही e-SIM खरेदी केले आहे का? गुगलने ब्लॉक केले 'हे' अ‍ॅप्स

जर तुम्ही ई-सिम वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण असे दोन अ‍ॅप्स गुगलने ब्लॉक केले आहेत, जे भारतीयांना ई-सिम विकत असत आणि फ्रॉड करत होते.

e-SIM Card : जर तुम्ही ई-सिम वापरत असाल(SIM) तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे, कारण असे दोन अ‍ॅप्स गुगलने ब्लॉक केले आहेत, जे भारतीयांना ई-सिम विकत असत. त्यामुळे गुगल प्ले स्टोअरवरून हे अ‍ॅप्स डाऊनलोड करता येणार नाहीत. हे दोन्ही अ‍ॅप्स आवश्यक परवानगी न घेता भारतात आंतरराष्ट्रीय ई-सिमची विक्री करत होते. गुगलने अ‍ॅपल Airalo आणि Holafly या दोन्हीवर बंदी घातली आहे.

अ‍ॅप्सच्या वापरावर निर्बंध

मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, दूरसंचार विभाग अर्थात DoT च्या सूचनेनुसार, गुगलने काही अ‍ॅप्स ब्लॉक केले आहेत. या अ‍ॅप्सचा वापर रोखण्यासाठी इंटरनेट पुरवणाऱ्या अ‍ॅप्सना माहिती देण्यात आली आहे.  Airalo आणि Holafly हे सिंगापूरस्थित अ‍ॅप्स आहेत, जे भारतात ई-सिमची विक्री करत असत.

ई-सिम म्हणजे काय?

ई-सिम हे एक डिजिटल सिम आहे, जे वापरकर्त्यांना फिजिकल सिम कार्ड न वापरता त्यांच्या नेटवर्कसह मोबाईल प्लॅन सक्रिय करण्यास अनुमती देते. भारतात परदेशी सिमकार्ड विकण्यासाठी एखाद्या कंपनीला दूरसंचार विभागाचे एनओसी आवश्यक असते, परंतु ऐरालो आणि होलाफ्ली अ‍ॅप्सकडे एनओसी किंवा अधिकृतता नव्हती. अशा तऱ्हेने दूरसंचार विभागाने अ‍ॅपल आणि गुगलला हे दोन अ‍ॅप्स हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अ‍ॅप अ‍ॅक्सेसवर निर्बंध

गुगल प्ले स्टोअरने 5 जानेवारीपासून दोन्ही अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस बंद केला आहे. अ‍ॅपल आणि गुगलच्या भारतीय युजर्ससाठी हे अ‍ॅप्स बंद करण्यात आले आहेत. मात्र, ते भारताबाहेर वापरासाठी उपलब्ध असेल. दूरसंचार विभागाच्या 2022 च्या धोरणानुसार, भारतीय वापरकर्त्यांना देण्यात आलेले हे सिमकार्ड केवळ देशाबाहेरच वापरले जाऊ शकतात. हे सिम विकण्यासाठी किंवा भाड्याने देण्यासाठी ग्राहकांना पासपोर्ट, व्हिसा आणि इतर कागदपत्रे द्यावी लागतात. तसेच सिम विक्रेत्यांना दर महा सुरक्षा यंत्रणांना ग्लोबल सिम डिस्ट्रीब्यूशन द्यावे लागणार आहे.

ई-सिमचे फायदे कोणते?

ई-सिम युजर्सला टेलिकॉम ऑपरेटर बदलताना सिमकार्ड बदलण्याची गरज नाही. त्यामुळे मोबाइल नेटवर्क स्विच सोपे होते. ई-सिमवर एका वेळी जास्तीत जास्त पाच व्हर्च्युअल सिमकार्ड साठवता येतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या नेटवर्कवर तुम्हाला पूर्ण सिग्नल मिळत नसेल तर तुम्ही लगेच नेटवर्क बदलू शकता. प्रवास करताना नेटवर्क बदलणे सोपे आहे. भारतात सध्या ई-सिमला सपोर्ट करणारे अनेक स्मार्टफोन उपलब्ध आहेत. यामध्ये अ‍ॅपल, सॅमसंग, गुगल, मोटोरोलाच्या स्मार्टफोनचा समावेश आहे.

इतर महत्वाची बातमी-

Heater In budget : हिवाळ्यात Havells Heater वर जोरदार डिस्काउंट; स्वस्तात घरी घेऊन या Heater

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  

व्हिडीओ

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
Embed widget