(Source: ECI/ABP News/ABP Majha)
loan Apps : लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांना गुगलचा दणका; Play Store वरून 2200 हून अधिक अॅप्स केले डिलीट
फेक लोन अॅप्सवर गुगलने कारवाई केली आहे. गुगलने सप्टेंबर 2022 ते ऑगस्ट 2023 या कालावधीत प्ले स्टोअरमधून 2,200 हून अधिक फेक लोन अॅप्स हटवले आहेत.
Loan App : हल्ली अनेक अॅप्स मिनिटात कर्ज (Loan App) देतात. गुगल प्ले स्टोअरवर असे अनेक अॅप्स उपलब्ध आहेत जे काही कागदपत्रांच्या आधारेच कर्ज देतात. मात्र काही अॅप्समध्ये कोणतेही कागदपत्र न दाखवता लोन मिळू शकतं. या अॅप्समार्फत मात्र अनेकांची फसवणूक (cyber fraud) होत असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. त्यामुळे अशा फेक लोन अॅप्सवर गुगलने कारवाई केली आहे. गुगलने (Google Play store) सप्टेंबर 2022 ते ऑगस्ट 2023 या कालावधीत प्ले स्टोअरमधून 2,200 हून अधिक फेक लोन अॅप्स हटवले आहेत.
फेक लोन अॅप्स केले डिलीट
युजर्सची सुरक्षा लक्षात घेऊन गुगलने कडक पावले उचलली आहेत. बनावट लोन अॅप्सला आळा घालण्यासाठी आणि आर्थिक घोटाळ्यांपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी सरकारच्या सततच्या प्रयत्नांनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गुगलने एप्रिल 2021 ते जुलै 2022 या कालावधीत सुमारे 3,500 ते 4,000 लोन अॅप्सचा आढावा घेतला आणि त्यापैकी 2,500 हून अधिक प्ले स्टोअरमधून बंदी घातली. सप्टेंबर 2022 ते ऑगस्ट 2023 या पुढील कालावधीत गुगलने 2,200 हून अधिक फसवे लोन अ ॅप्स नष्ट करून आपली कारवाई सुरूच ठेवली आहे.
गुगलने लोन अॅप्सच्या नियमात केला बदल
याशिवाय गुगलनेही आपल्या नियम आणि धोरणात बदल केला आहे. गुगलने प्ले स्टोअरवर लोन अॅप लागू करण्यासंदर्भात आपले धोरण अपडेट केले आहे. गुगल केवळ रेग्युलेटेड संस्था (आरई) द्वारे प्रकाशित केलेल्या किंवा आरईसह सहकार्य करणाऱ्या अॅप्सना परवानगी देते. भारतातील लोन अॅप्सचा वाढती संख्या पाहता टेक जायंटने हा निर्णय घेतला आहे.
फेक लोन अॅप्सपासून सावध राहा
-बनावट लोन अॅप्सपासून बचाव करण्यासाठी ग्राहकांनी काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.
-आरबीआयने नोंदणी न केलेल्या अॅपवरही आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नका.
-गुगल प्ले किंवा अॅपल अॅप स्टोअरवरुनच अॅप्स डाऊनलोड करा.
-फेक लोन अॅप्सला बळी पडू नका.
- अॅप्स जास्त व्याज दर किंवा आगाऊ शुल्क भरण्यासाठी दबाव आणतात. ते अॅप्स वापरु नका.
-आपल्यासोबत असे काही घडल्यास त्याची माहिती तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना कळवा.
इतर महत्वाची बातमी-
Chinese Apps : भारताचा चीनवर 'डिजिटल स्ट्राईक', 200 हून अधिक चिनी ॲप्सवर बंदी