Smartphone : मोबाईल स्क्रीनवर भरपूर जाहिराती दिसतायत? काळजी करू नका, 'या' छोट्या सेटिंगमुळे काम सोपं होईल
Smartphone : यासाठी सर्वात आधी तुमच्या मोबाईलच्या सेटिंग्जमध्ये जाऊन सर्च बारमध्ये 'Private DNS' टाइप करा आणि सर्च करा.
Smartphone : अनेकदा मोबाईल (Mobile) वापरताना आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये नेटवर्क इश्यु आणि व्हिडीओ (Video) पाहताना सतत जाहिरातींचा (Advertisement) होणारा भडीमार यांचा समावेश आहे. यामुळे अनेकदा फोन वापरताना आपल्याला मनस्ताप सहन करावा लागतो, आपली चिडचिड होते. पण, यापुढे तुमच्याबरोबर असं होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर चिंता करू नका. या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. ज्या तुम्हीही फॉलो करू शकता आणि या त्रासापासून मुक्त होऊ शकता.
'अशा' प्रकारे जाहिराती ब्लॉक होतील
- यासाठी सर्वात आधी तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन सर्च बारवर क्लिक करा आणि 'Private DNS' टाईप करून सर्च करा.
- यानंतर 'Private DNS'वर क्लिक करा आणि प्रायव्हेट डीएनएस प्रोव्हायडर होस्टनेमच्या ऑप्शनवर क्लिक करा.
- याच्या खाली तुम्हाला एक ब्लॅंक स्पेस दिसेल. या ठिकाणी तुम्हाला privatednsadguard.com असं लिहायचं आहे.
- यानंतर ही कमांड सेव्ह करा. हे केल्यानंतर तुम्हाला जाहिराती दिसणं बंद होईल.
तुमच्या मोबाईलमध्ये थर्ड पार्टी अॅप्स कमी वापरण्याचा प्रयत्न करा. कारण यामुळे अनेकदा जाहिराती जास्त येतात.
'या' पद्धतीने सुद्धा जाहिराती येणार नाहीत
जर वर नमूद केलेल्या पद्धतींचा वापर करून देखील जाहिराती येत असतील तर तुमच्या फोनमध्ये काही नवीन सेटिंग करू शकता. यासाठी सर्वात आधी तुमच्या मोबाईलच्या सेटिंग्जमध्ये जाऊन गुगलवर क्लिक करा. यानंतर 'Manage Your Google Account' या ऑप्शनवर क्लिक करा.
या ठिकाणी 'Data & Privacy' ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर ‘Personalized Ads’ वर क्लिक करा. या ठिकाणी गेल्यानंतर तुमची कोणकोणती अॅक्टिव्हिटी ट्रॅक केली जातेय हे तुम्हाला दिसेल. याच कारणामुळे तुम्हाला जाहिराती दिसतात. गुगल तुम्हाला तुमच्या आवडीनुसार आणि सर्चनुसारच जाहिराती दाखवतो.
‘Personalized Ads’ नंतर 'My Ad Center' या ऑप्शनवर क्लिक करा. येथे 'Personalized Ads' चा ऑप्शन दिसेल. तो बंद करा. हे केल्यानंतर, मोबाईलच्या सेटिंग्जमध्ये पुन्हा जा आणि Google वर क्लिक करा आणि 'Advertising ID' वर क्लिक करून तो डिलीट करा.
या सेटिंग्ज केल्यानंतर, तुम्हाला मोबाईलवर जाहिराती दिसणं बंद होईल. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या व्हिडीओचा आनंद घेऊ शकता.
महत्त्वाच्या बातम्या :