एक्स्प्लोर

Online Payment Fraud: सावधान! 'या' ॲपवर अशी होतेय फसवणूक, ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

Online Payment Fraud: ऑनलाइन व्यवहार करणे हा आता सर्वात पसंतीचा पेमेंट पर्याय बनला आहे. रोख घेऊन जाण्याऐवजी, लोक आता गुगल पे, पेटीएम, फोनपे सारख्या अॅप्सद्वारे पैसे देण्यास प्राधान्य देतात. मात्र आता या ॲपद्वारे देखील आपली फसवणूक केली जातेय.

Online Payment Fraud: ऑनलाइन व्यवहार करणे हा आता सर्वात पसंतीचा पेमेंट पर्याय बनला आहे. रोख घेऊन जाण्याऐवजी, लोक आता गुगल पे, पेटीएम, फोनपे सारख्या अॅप्सद्वारे पैसे देण्यास प्राधान्य देतात. मात्र आता या ॲपद्वारे देखील आपली फसवणूक केली जातेय. त्यामुळे ऑनलाइन पेमेंट ॲप वापरत असाल तर खबरदारी घ्या, नाही तर तुमचीही होऊ शकते मोठी फसवणूक.

गेल्या काही वर्षंपासून  देशात स्मार्टफोनद्वारे व्यवहार करण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र दुसरीकडे ऑनलाइन फसवणूकीच्या घटनांदेखील वाढल्या आहेत. हे फसवणूक करणारी टोळी लोकांना चुना लावण्यासाठी सतत नवनवीन मार्ग शोधत असतात. ऑनलाइन ॲपद्वारे विविध मार्गे फसवणूक होत असताना,  त्यात आता ऑनलाइन ॲपच्या माध्यमातून तुम्हाला चुकून पैसे पाठवले आहेत, असं सांगत लोकांची फसवणूक केली जाते. अशीच एक घटना मुंबई परिसरात घडली. यामध्ये एका व्यक्तीला अनोळखी क्रमांकावरून फोन आला. पैसे दुसऱ्याला पाठवत होतो, परंतु तुम्हाला चुकून पाच हजार रुपये आले आहेत,  माझे पैसे मला परत करा, तुम्हाला मी रिक्वेस्ट पाठवली आहे. हे सांगतात समोरच्या व्यक्तीने त्याने पाठवलेली रिक्वेस्ट स्वीकारली आणि त्याच्या अकाउंट मधून पाच हजार रुपये वजा झाले. ही त्याची झालेली फसवणूक होती, हे काही वेळाने त्याच्या लक्षात आले. अशा प्रकारे अनेकांची फसवणूक होत असल्याचं सध्या समोर येत आहे. 

कशाप्रकारे फ्रॉड होतात ?

आजकाल तुम्हाला कोणीही एखादा अनोळखी व्यक्ती मेसेज पाठवेल आणि भासवेल की मी तुम्हाला काही पैसे पाठवले आहेत. 500 पाठवले किंवा पाच हजार पाठवले असे सांगतात. हे पैसे तुम्हाला चुकून आले असं ते तुम्हाला सांगतात. कोणी सांगत की, हे पैसे वैद्यकीय कारणासाठी मी कोणालातरी पाठवत होतो. तर यामध्ये कोणी सांगत की, मी एक विद्यार्थी आहे ते पैसे मी फीजसाठी भरत होतो, मात्र तुम्हाला चुकून आले. चांगल्या प्रकारे गुंग ठेवून विनंती करतात. मग आपल्याला वाटतं की खरंच हे चुकून पैसे आले असतील. पैसे परत पाठवण्यासाठी ते एक अप्रू लिंक पाठवतात. त्या प्री-लिंकवर क्लिक केल्यावर आपला पिन क्रमांक टाकायचा असतो. प्री वर किती पैसे आपण त्याला परत करतोय किंवा त्याचे किती पैसे द्यायचे आहेत हे काही मेन्शन नसतं. मग आपण क्लिक करत प्रोसेस कम्प्लीट करतो आणि आपल्या अकाउंट वरून त्याला पैसे जातात अशाप्रकारे हे फ्रॉड घडत आहेत, असे सायबर एक्सपर्ट प्रशांत माळी यांनी सांगितलं आहे.

हे फ्रॉड टाळण्यासाठी काय करायला हवं?

जर आपल्याला असं काही एखादा कॉल आला तर पहिला समोरच्याचा यूपीआय आयडी चेक करा. खरच पैसे आले आहेत का हे पण चेक करा. समोरच्याने पाठवलेल्या कोणत्याही लिंक वर क्लिक करू नका. कोणत्याही प्रकारचा पिन नंबर मागितला तर तोही देऊ नका. जर खरंच चुकून कोणाचे पैसे आले असतील तर त्याचा यूपी आयडी चेक करा आणि ते चेक झालं तरच कृपया व्यवहार करा, ही काळजी अशा ऑनलाईन फसवणुकीपासून वाचण्यासाठी घ्यायला हवी, असे सायबर एक्सपर्ट प्रशांत माळी यांनी सांगितले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sarpanch Viral Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Priyanka Gandhi In Kolhapur : प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमानतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमानतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Congress :भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी काढले प्रियंका गांधींचे होर्डींग्जCM Eknath Shinde : माहीमचा गोंधळ ते मुख्यमंत्रीपद..एकनाथ शिंदेंची स्फोटक मुलाखत!TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sarpanch Viral Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Priyanka Gandhi In Kolhapur : प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमानतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमानतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Benjamin Netanyahu : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Video : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
×
Embed widget