Reliance Jio Plan : Jio चा सर्वात स्वस्त 299 रुपयांचा प्लान, 56GB डेटासह इतरही फायदे!
Reliance Jio Plans: 299 रुपयांचा प्लॅन जिओच्या (Jio Recharge plan below 300 Rs) स्वस्त प्लॅनमध्ये गणला जातो.
![Reliance Jio Plan : Jio चा सर्वात स्वस्त 299 रुपयांचा प्लान, 56GB डेटासह इतरही फायदे! reliance jio rupees 299 plan with 56gb data and others benefits 28 days validity Reliance Jio Plan : Jio चा सर्वात स्वस्त 299 रुपयांचा प्लान, 56GB डेटासह इतरही फायदे!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/28/4762e693e029bc102d08c826270a90ba1701109891344290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Reliance Jio Recharge Plans : रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपल्या स्वस्त प्लॅनसाठी ओळखला जातो. 299 रुपयांचा प्लॅन जिओच्या (Jio Recharge plan below 300 Rs) स्वस्त प्लॅनमध्ये गणला जातो. जर तुम्ही देखील 300 रुपयांपेक्षा कमी किमतीची मासिक योजना शोधत असाल तर हा प्लान तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. Jio च्या स्वस्त प्लानचे फायदे.
रिलायन्स जिओचा 299 रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओच्या 299 रुपयांच्या प्लानची वैधता 28 दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्सना 2 GB डेटा प्रमाणे एकूण 56 GB डेटा मिळतो. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर, वेग 64Kbps पर्यंत कमी होतो. या पॅकमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉल्सची सुविधा मिळते आणि प्लॅनमध्ये 100 मोफत एसएमएस देण्यात येत आहेत. जिओच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.
रिलायन्स जिओचा 395 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
रिलायन्स जिओचा 395 रुपयांचा प्लॅन अशा ग्राहकांसाठी आहे जे दीर्घ वैधता योजना शोधत आहेत. जिओच्या 395 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 दिवसांची वैधता मिळते. ग्राहकांना एकूण 6GB डेटा मिळेल. तसेच, सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉल आणि 1,000 एसएमएस मोफत उपलब्ध असतील. तुमच्या डेटा प्लॅनच्या मर्यादेपर्यंत पोहोचल्यानंतर, वेग कमी होऊन 64Kbps होईल.
तुम्हालाही हे फायदे मिळतील
या 395 रुपयांच्या जिओ प्लॅनमध्ये ग्राहकांना इंटरनेट डेटा, कॉलिंग आणि एसएमएस व्यतिरिक्त इतर फायदे देखील मिळतात. यामध्ये Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चा अॅक्सेस उपलब्ध आहे. जर तुमच्या फोनमध्ये आणि परिसरात 5G असेल तर तुम्हाला या प्लॅनमध्ये 5G सेवा देखील मिळेल. ही योजना त्यांच्यासाठी सर्वोत्तम आहे जे दीर्घ कालावधीचे रिचार्ज शोधत आहेत.
Laptop आणि Computer कंपन्यांना Jio देणार मोठा धक्का
जिओ कंपनी आता क्लाऊड लॅपटॉप लाँच करण्याची तयारी करत आहे. ज्याची किंमत सुमारे 15,000 रुपये असण्याची शक्यता आहे. मात्र कंपनीने अद्याप क्लाउड लॅपटॉपची किंमत अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. पण कंपनीची पार्श्वभूमी पाहता याची किंमत युजर फ्रेंडली असेल असे म्हटले जात आहे. ETच्या रिपोर्टनुसार, रिलायन्स जिओ एचपी एसर, लेनोवोसह इतर कम्युटर निर्मात्यांसोबत क्लाउड लॅपटॉपवर काम करत आहे.
इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, या विषयाशी संबंधित लोकांनी सांगितले की, सध्या एचपी क्रोमबुकवर 'क्लाउड लॅपटॉप'साठी चाचणी सुरू आहे. रिलायन्स जिओ मासिक सबस्क्रिप्शनच्या आधारे लोकांना स्वस्त दरात क्लाउड लॅपटॉप उपलब्ध करण्याची शक्यता आहे. तुम्हाला क्लाऊड कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप कसे काम करतात आणि ते लॅपटॉप आणि कॉम्प्युटर मार्केटला कसे नुकसान पोहोचवणार आहेत हे सांगणार आहोत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)