Realme 11 Pro Series भारतात लाँच; किंमतीसह भन्नाट फिचर्स आणि बरंच काही, वाचा सविस्तर...
Realme 11 Pro Series Launch : Realme 11 Pro Series आज भारतात लाँच करण्यात आली आहे. याची किंमत, फिचर्स इतर गोष्टींबाबत सविस्तर वाचा...
Realme 11 Pro Series Launch : आघाडीची स्मार्टफोन कंपनी रिअलमी (Realme) ने आज भारतात Realme 11 Pro सीरिज (Realme 11 Pro Series) लाँच करण्यात आली आहे. या अंतर्गत चायनीझ कंपनी रिअलमी (Realme) दोन नवीन फोन लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ हे दोन स्मार्टफोन आहेत. या नवीन स्मार्टफोन सीरिजमध्ये आकर्षक डिझाईन आणि आधुनिक फिचर्सचा समावेश आहे. Realme 11 Pro+ मध्ये 200-मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सर आणि 100w फ्लॅश चार्ज सपोर्टसह 5000mAh बॅटरी आहे.
Realme 11 Pro Series भारतात लाँच
Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ हे फोन आधीच चीनमध्ये लाँच करण्यात आलेले आहेत. त्यामुळे फोनचे डिझाईन आणि फिचर्सबाबत माहिती समोर आली आहे. Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ स्मार्टफोनचं डिझाईन, फिचर्स आणि किंमतीबाबत अधिक जाणून घ्या.
आकर्षक आणि लक्षवेधी डिझाईन
Realme 11 Pro सीरिज अतिशय आकर्षक आणि लक्षवेधी डिझाईनसह येते. Realme 11 Pro+ मून शॉट्स कॅप्चर करण्यासाठी मून मोडसह 200- मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. या दोन्ही स्मार्टफोनची प्री-बुकींगही आजपासून सुरु झाली आहे. या फोनची प्री-बुकींग केल्यास तुम्हाला 4499 रुपयांचा Realme Watch 2 Pro मोफत मिळेल.
Realme 11 Pro Series Price : अपेक्षित किंमत
Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ हे दोन मॉडेल आज भारतात लाँच करण्यात आहेत. Realme 11 Pro चे बेस व्हेरिएंट 8GB RAM आणि 256GB स्टोरेज ऑफर करत, याची किंमत 23,999 रुपये आहे. दुसरीकडे, Realme 11 Pro+ स्मार्टफोन 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजच्या बेस कॉन्फिगरेशनसह येईल आणि त्याची किंमत 29,999 रुपये आहे.
Realme 11 Pro, Realme 11 Pro+ Features : फिचर्स
Realme 11 Pro हा 6.7-इंचाच्या AMOLED डिस्प्लेसह येते. यामध्ये फुल HD+ स्क्रीन रिझोल्यूशन आणि स्मूथ 120Hz रिफ्रेश रेटचा दावा कंपनीने केला आहे. हे दोन्ही फोन आधुनिक फिचर्ससह येतात. याचा डिस्प्ले 100 टक्के DCI-P3 कलर गॅमटला सपोर्ट करणार आहे. Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ नवीन ऑपरेटिंग सिस्टम Android 13 वर चालेल. यामध्ये Realme UI 4.0 चा इंटरफेस असेल.
Realme 11 Pro कॅमेरा आणि बॅटरी
Realme 11 Pro मध्ये ड्युअल रीअर कॅमेरा सेटअप असेल. यामध्ये क्रिस्प आणि स्थिर फोटोग्राफीसाठी ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह 108MP प्रायमरी सेन्सरने हेडलाइन करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त, या स्मार्टफोनमध्ये क्लोज-अप शॉट्ससाठी 2MP मॅक्रो युनिट देण्यात आलं आहे. तसेच 16MP कॅमेरा सेल्फी आणि व्हिडीओ कॉलचा उत्तम अनुभव देईन. Realme 11 Pro मध्ये 5,000mAh बॅटरी पॅक आहे. यामुळे जलद आणि सोयीस्कर चार्जिंग होईल.