Poco Smartphone : Poco चा नवीन स्मार्टफोन लवकरच होणार लॉन्च; फीचर्स जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल
Poco Smartphone : Poco लवकरच भारतात नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. Poco X6 Neo असं या स्मार्टफोनचं नाव असणार आहे.
Poco Smartphone : Poco च्या स्मार्टफोनला (Smartphone) भारतात सुरुवातीपासूनच ग्राहकांची पसंती मिळाली आहे. या कंपनीचे स्मार्टफोन विशेषत: बजेट रेंजच्या गेमर्सना आवडतात. कंपनीने नुकतीच आपली नवीन सीरीज लॉन्च केली होती पण आता कंपनी आपल्या Poco X6 सीरीजचा नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या फोनचे नाव Poco X6 Neo असं असणार आहे.
मिळालेल्या रिपोर्टनुसार, Poco कंपनी भारतात Poco X6 Neo आणि Poco F6 लॉन्च करणार आहे. कंपनीने या दोन स्मार्टफोनच्या संदर्भात अद्याप कोणतीही माहिती शेअर केली नसली तरी 91Mobiles सोबत प्रसिद्ध टिपस्टर योगेश ब्राउन यांनी या दोन फोनबद्दल काही माहिती शेअर केली आहे. टिपस्टरने या दोन्ही फोनच्या लॉन्च टाईमलाइनविषयी माहिती दिली आहे.
चीनमध्ये रेडमी, भारतात पोको
रिपोर्टनुसार, Poco X6 Neo भारतात मार्चमध्ये लॉन्च होईल. हा फोन Redmi Note 13R Pro चे रीब्रँडेड व्हर्जन म्हणून लॉन्च केला जाईल. याशिवाय Poco F6 भारतात जुलै महिन्यात लॉन्च होईल.
कंपनीने अद्याप या फोनच्या कोणत्याही फीचर्स किंवा स्पेसिफिकेशन्सबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. हा फोन Redmi Note 13R Pro चा भारतीय व्हेरिएंट असल्याचे बोलले जात आहे. तसे असल्यास, Poco च्या या फोनमध्ये 6.67 इंचाचा OLED डिस्प्ले असू शकतो, जो पंच होल कटआउटसह येईल. याशिवाय, या फोन डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आणि पीक ब्राइटनेस 1000 nits असू शकतो.
फोनची वैशिष्ट्ये काय?
Redmi Note 13R Pro मध्ये प्रोसेसरसाठी MediaTek Dimensity 6080 चिपसेट वापरण्यात आला आहे. आता हाच फोन भारतात लॉन्च होणाऱ्या Poco X6 Neo मध्ये वापरला जाऊ शकतो की नाही हे पाहणे बाकी आहे. याशिवाय फोनच्या मागील बाजूस 108MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, जो 2MP डेप्थ सेन्सरसह येतो. सेल्फीसाठी फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा आहे. Redmi चा हा फोन 12GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेज सह येतो.
हा फोन चीनमध्ये जवळपास 23,750 रुपयांना भारतीय रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. आता या फोनच्या भारतीय व्हेरिएंट म्हणून लॉन्च होणाऱ्या Poco X6 Neo चे स्पेसिफिकेशन्स काय आहेत आणि कंपनी या फोनची किंमत नक्की किती ठेवते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :