(Source: ECI/ABP News/ABP Majha)
OPPO चा नवीन Find N2 फ्लिप फोन 17 मार्चपासून खरेदीसाठी होणार उपलब्ध, जाणून घ्या किंमत
OPPO Find N2 Flip Price: तुम्ही OPPO चा फोल्डेबल फोन OPPO Find N2 Flip 17 मार्चपासून खरेदी करू शकाल. कंपनीने स्मार्टफोनची किंमत जाहीर केली आहे आणि तुम्ही तो 89,999 रुपयांना खरेदी करू शकता.
OPPO Find N2 Flip Price: तुम्ही OPPO चा फोल्डेबल फोन OPPO Find N2 Flip 17 मार्चपासून खरेदी करू शकाल. कंपनीने स्मार्टफोनची किंमत जाहीर केली आहे आणि तुम्ही तो 89,999 रुपयांना खरेदी करू शकता. एवढेच नाही तर कंपनी ग्राहकांना 5,000 रुपयांपर्यंतची सूट आणि 5,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील देत आहे. जे Oppo चा फोन एक्सचेंज करणार त्यांना 5,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळेल. तर कंपनी नॉन-ओप्पो फोन एक्सचेंज करणार्यांना 2,000 रुपयांचा बोनस देत आहे. तुम्ही मोबाईल फोन मून लाईट पर्पल आणि अॅस्ट्रल ब्लॅकमध्ये ऑर्डर करू शकाल. भारतात हा स्मार्टफोन सिंगल स्टोरेज व्हेरिएंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. तुम्ही हा स्मार्टफोन 8 आणि 256gb मध्ये खरेदी करू शकाल.
OPPO Find N2 Flip Price: स्पेसिफिकेशन
OPPO Find N2 Flip च्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.79 इंच मेन डिस्प्ले आणि 3.26 इंच कव्हर डिस्प्ले मिळेल. मोबाईल फोन 8GB रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. स्मार्टफोनमध्ये 4300 mAh बॅटरी उपलब्ध आहे, जी 44 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोटोग्राफीसाठी तुम्हाला Find N2 Flip मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. फ्रंटमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये तुम्हाला MediaTek Dimensity 9000 Plus चिपसेटचा सपोर्ट मिळत आहे.
OPPO Find N2 Flip Price: येथून खरेदी करू शकता हा फोन
तुम्ही ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट आणि ओप्पोच्या अधिकृत स्टोअरवरून OPPO Find N2 फ्लिप खरेदी करू शकता.
Your world is about to flip open in amazement 🤩. Equipped with features you've always desired, the performance-packed stunner #OPPOFindN2Flip is here, make it yours for ₹89,999/- 🤑.
— OPPO India (@OPPOIndia) March 13, 2023
Get ready to #SeeMoreInASnap!#BestFlipPhone pic.twitter.com/tDnMYh4qCn
सॅमसंग 'हा' फोन 16 मार्चला लॉन्च करणार
Samsung 16 मार्च रोजी भारतात Samsung Galaxy A54 5G स्मार्टफोन लॉन्च करेल. स्मार्टफोनला 6.4-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले मिळेल. जो 120hz च्या रिफ्रेश रेटसह येईल. तुम्हाला मोबाईल फोनमध्ये 5000 MH बॅटरी आणि 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा मिळू शकतो. कंपनी सुमारे 30,000 रुपयांमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च करू शकते.
इतर बातमी:
फक्त 4 हजारात Samsung चा हा 5G फोन घेऊन जा घरी, जाणून घ्या काय आहे ऑफर