एक्स्प्लोर

OPPO Reno 11 Pro Features : OPPO Reno 11 Pro लवकरच भारतात होणार लाँच होणार; दमदार फिचर्स लीक

OPPO Reno 11 Pro हा फोन भारत लवकरच लॉंच होणार असल्याची माहिती आहे. या फोनची स्पेसिफिकेशन्स नेमके काय आहे जाणून घेऊयात...

OPPO Reno 11 Pro Features :  ओप्पोने आपली रेनो सीरिज नोव्हेंबरमध्ये चीनमध्ये लाँच केली होती. त्यांचा ओप्पो रेनो 11 नुकताच टीडीआरए, बीआयएस, एफसीसी  (OPPO Reno 11 Pro Features)आणि गीकबेंच वेबसाइटवर लाँच करण्यात आला होता. तर आता ओप्पो रेनो 11 प्रोला एनबीटीसी, बीआयएस, सिरिम आणि एसडीपीपीआय सर्टिफिकेशन मिळालं आहे. या फोनचे भारत आणि ग्लोबल लाँचिंग लवकरच होणार असल्याची माहिती आहे. चीनमध्ये लॉंच झालेल्या फोनचे स्पेसिफिकेशन्सचे जाणून घेऊया...

ओप्पो रेनो 11 प्रो ला एनबीटीसी प्रमाणपत्रावर CPH2607 मॉडेल क्रमांकासह पाहिले गेले आहे. या लिस्टिंगमध्ये डिव्हाइस 5G नेटवर्क सपोर्ट फिचर असल्याचं सांगितलं जात आहे. रेनो 11 प्रोच्या सिरिम, बीआयएस आणि एसडीपीपीआय लिस्टिंगबद्दल बोलायचे झाले तर त्यात फक्त मॉडेल नंबर समोर आला आहे. आयएमडीए प्रमाणपत्रावर मोबाइल एनएफसी सपोर्ट असेल असे दिसून आले आहे. काही दिवसांत प्लॅटफॉर्मवर येऊन हा स्मार्टफोन लवकरच भारतात आणि जागतिक स्तरावर लाँच केला जाईल, अशी माहिती आहे.

डिस्प्ले आणि स्टोरेज

ओप्पो रेनो 11 प्रो 5G डिव्हाइसचीनमध्ये 6.74 इंचाचा कर्व्ड ओएलईडी एफएचडी+ डिस्प्लेसह येतो. ही स्क्रीन 120 हर्ट्झरिफ्रेश रेट, 240 हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट, 16000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस प्रदान करते. मोबाइलच्या फ्रंटमध्ये पंच होल कटआऊट नॉच आहे. ब्रँडने या दमदार फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 चिपसेट ऑफर केला आहे. ग्राफिक्ससाठी अॅड्रेनो जीपीयू स्थापित आहे.ओप्पो रेनो 11 प्रोमध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी दोन व्हेरियंट सादर करण्यात आले आहेत. यात 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज आणि 12 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज आहे.

कॅमेरा आणि बॅटरी 

 कॅमेरा फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर रेनो 11 प्रो ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपने सुसज्ज आहे. यात ओआयएस सपोर्टसह एफ/1.8 अपर्चर सह 59 एमपी प्रायमरी कॅमेरा, 32 एमपी पोर्ट्रेट लेन्स आणि 2 एक्स हायब्रिड झूम आणि 20 एक्स डिजिटल झूमसह 8 MP दुसरा लेन्स आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32 MP फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरीच्या बाबतीत रेनो 11 प्रो मध्ये 4,700mAh  बॅटरी आणि 80 W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर हा मोबाइल अँड्रॉइड 14 वर काम करतो.

इतर महत्वाची बातमी-

How To Update ADHAR Card : सगळी कामं सोडा पण 14 डिसेंबरपूर्वी आधार कार्ड फ्रीमध्ये अपडेट नक्की करा, नाहीतर...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ

व्हिडीओ

Operation Lotus : ऑपरेशन कमळ, शिंदेसेनेत खळबळ? अधिवेशनाचा पहिला दिवस, ठाकरेंचा बॉम्ब Special Report
Vande Mataram Controversy : 'वंदे मातरम', नेहरु आणि राजकारण; मोदींचा हल्लाबोल Special Report
Cast Politics : जात कोणती? मानसिकता कोती? मनात जातीयता पेरण्याचा प्रयत्न Special Report
Aaditya Thackeray VS Bhaskar Jadhav : जाधवांचं नाव, ठाकरेंचाच भाव? ठाकरेंच्या मनात कोण? Special Report
Jayant Patil Majha Vision : पार्थ पवार प्रकरण ते भाजप प्रवेशाची चर्चा ; जयंत पाटील EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
Embed widget