How To Update ADHAR Card : सगळी कामं सोडा पण 14 डिसेंबरपूर्वी आधार कार्ड फ्रीमध्ये अपडेट नक्की करा, नाहीतर...
सगळी कामं सोडा पण 14 डिसेंबरपूर्वी आधार कार्ड फ्रीमध्ये अपडेट नक्की करा. नाहीतर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पैसे लागू शकतात.
How To Update ADHAR Card : युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) स्टँडर्ड फी काढून टाकली आहे. जर तुम्हाला 14 डिसेंबरपर्यंत आधार अपडेट करायचा असेल तर तुम्हाला 50 रुपये फी भरावी लागणार नाही. या दरम्यान नागरिकांना लोकसंख्येची माहिती, पत्ता, जन्मतारीख, लिंग, मोबाइल नंबर आणि ईमेल दुरुस्त करण्याची संधी फ्री मिळणार असून त्यासाठी त्यांना कोणतेही वेगळे पैसे भरावे लागणार नाही. तर, आधारमध्ये सर्व डेमोग्राफिक माहिती भरणं पूर्णपणे फ्री आहे आणि आपण घरबसल्या ऑनलाइन करू शकता. मात्र, एखाद्याला अनेक छायाचित्रे, आयआरआयएस किंवा इतर बायोमेट्रिक अपडेट करायचे असतील तर त्याला आधार नोंदणी केंद्रात जाऊन येथे लागू शुल्क भरावे लागेल. बायोमेट्रिक अपडेटसाठी विशेष गॅजेट्सची आवश्यकता असते आणि ती केवळ नोंदणी केंद्रांवर उपलब्ध असतात. ज्याच्या मदतीने फिंगरप्रिंट स्कॅन केले जातात.
आधार कार्ड अपडेट करा अन् फसवणूक टाळा !
फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी बायोमेट्रिक अपडेटकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. यूआयडीएआयने दर 10 वर्षांनी आधार कार्डची माहिती अपडेट करणं बंधनकारक केलं आहे. आपली माहिती अचूक आणि अपडेट आहे याची खात्री करणं देखील आवश्यक आहे. आधार फ्रॉड टाळण्यासाठी अपडेट्स देखील आवश्यक आहेत. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाल्यास पत्ताही बदलावा लागतो. त्यामुळे 14 तारखेच्या आत तुमचं आधार अपडेट करुन घ्या.
सतत अपडेट का करावं?
यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही ही माहिती अपडेट करू शकता. सततच्या अपडेटमुळे आधार हा विश्वासार्ह स्त्रोत बनतो. यामुळे तुम्हाला खूप मदत ही होते. त्यामुळेच लोक ते वेळोवेळी अपडेट ही करतात. सध्या फ्री अपडेटची तारीखही 14 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
आधार कार्ड अपडेट करायच्या महत्वाच्या स्टेप्स
-मोबाइल किंवा लॅपटॉपवरून यूआयडीएआयच्या वेबसाइटला भेट द्या. यानंतर अपडेट आधारच्या पर्यायावर क्लिक करा. आता आधार क्रमांक टाकून ओटीपीद्वारे लॉगिन करा.
-त्यानंतर डॉक्युमेंट अपडेटवर क्लिक करा आणि व्हेरिफिकेशन करा. आता खालील ड्रॉप लिस्टमधून ओळखपत्राची स्कॅन केलेली प्रत आणि पत्त्याचा पुरावा अपलोड करा.
-आता सबमिटवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट नंबर मिळेल आणि फॉर्म सबमिट होईल. रिक्वेस्ट नंबरवरून अपडेटची स्टेटस देखील तपासू शकाल. काही दिवसांनी तुमचे आधार अपडेट होईल.
इतर महत्वाची बातमी-