Offline Netflix : तुम्ही इंटरनेटशिवाय Netflix वर चित्रपट आणि वेब सिरीज पाहू शकता; फक्त 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करा
Offline Netflix : एकदा तुम्ही Netflix वर डाऊनलोड केलेला कंटेंट पाहिल्यानंतर, तुम्ही स्पेस मोकळी करण्यासाठी तुमच्या डिव्हाईसवरून ती हटवू शकता.
Offline Netflix : आपल्या मोकळ्या वेळेत मनोरंजनासाठी, लोक इंटरनेटच्या मदतीने OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपट, वेब सिरीज, सीरिज आणि डॉक्युमेंट्री पाहतात. पण, जेव्हा यूजर्सकडे इंटरनेट सुविधा नसते किंवा ते अशा ठिकाणी असतात जिथे इंटरनेटचा स्पीड नाही तिथे कंटाळा शिवाय पर्याय नाही.
ही समस्या समजून घेऊन नेटफ्लिक्सने (Netflix) युजर्ससाठी एक उपाय शोधला आहे, ज्यामध्ये आता नेटफ्लिक्स यूजर्स इंटरनेटशिवाय नेटफ्लिक्सवर मनोरंजनाचा आनंद घेऊ शकणार आहेत. ज्यामध्ये Netflix यूजर्स अनेक चित्रपट, वेब सिरीज, मालिका आणि डॉक्युमेंट्रीचा आनंद घेऊ शकतील. जर तुम्ही देखील नेटफ्लिक्स यूजर असाल तर तुम्हाला ते वापरण्याच्या स्टेप्स माहित असणं आवश्यक आहे.
इंटरनेटशिवाय नेटफ्लिक्सवर कंटेंट कसा पाहावा?
नेटफ्लिक्स ऑफलाईन मोडमध्ये चित्रपट, वेब सिरीज, मालिका आणि माहितीपट पाहण्याची परवानगी देते. यासाठी, तुम्हाला इंटरनेटच्या असताना नेटफ्लिक्समध्ये कंटेट डाऊनलोड करावा लागेल. त्यानंतर तुम्ही इंटरनेटशिवाय नेटफ्लिक्सवर मनोरंजनाचा आनंद घेऊ शकता.
Netflix वर कंटेंट कसा डाउनलोड करावा?
यासाठी तुम्हाला नेटफ्लिक्स ॲप ओपन करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला डाऊनलोड करायचा आहे तो कंटेंट निवडा. यानंतर तुम्हाला खालच्या दिशेने बाणाचे चिन्ह दिसेल. त्यावर टॅप करून तुम्ही ती कंटेंट डाऊनलोड करू शकता. हा कंटेंट डाऊनलोड करण्यापूर्वी, तुम्ही स्टॅंडर्ड किंवा हाय क्वालिटी कंटेंट निवडू शकता.
यानंतर, तुम्ही नेटफ्लिक्स ॲपमधील 'डाऊनलोड' विभागात जाऊन डाऊनलोड प्रोग्रेस पाहू शकता. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की, डाऊनलोड करण्यासाठी इंटरनेट कनेक्शन चांगलं असणं आवश्यक आहे. एकदा डाऊनलोड पूर्ण झाल्यावर, तुम्ही नेटफ्लिक्स ॲपच्या 'डाऊनलोड' विभागात जाऊन तुमचे डाऊनलोड केलेले चित्रपट आणि वेब सीरिज पाहू शकता.
डाऊनलोड कंटेंट कायमस्वरूपी टिकत नाही
Netflix वर डाऊनलोड केलेला कंटेंट कायमस्वरूपी सेव्ह केला जात नाही. Netflix काही काळानंतर तो काढून टाकतात. वेगवेगळ्या चित्रपटांसाठी आणि वेब सीरिजसाठी हा काळ वेगळा असू शकतो. सहसा ते 2 दिवस ते 30 दिवसांपर्यंत असते. तुम्ही तुमचे Netflix मेंबरशीप रद्द केल्यास, डाऊनलोड केलेले चित्रपट आणि वेब सिरीज तुमच्या डिव्हाईसवरून काढून टाकल्या जातील. तुम्ही पुन्हा सदस्यत्व घेतल्यास, तुम्हाला ते पुन्हा डाऊनलोड करावे लागतील. अशा प्रकारे तुम्ही नेटफ्लिक्सवर कंटेंट पाहू शकता.
महत्त्वाच्या बातम्या :