अमेरिकन परिवहन विभागाने शुक्रवारीच विमानांमधून गॅलेक्सी नोट-7 घेऊन प्रवास करण्याबर बंदी घातली होती. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई, तसेच हॅण्डसेट जप्त करण्याच्याही सुचना अमेरिकन परिवहन विभागाने सर्व एअरलाईन्सला दिल्या आहेत.
2/5
बॅटरीमधील स्फोटांच्या घटनांमुळे सॅमसंगने आपले गॅलेक्सी सीरीजमधील नोट-7 स्मार्टफोन बाजारातून परत मागवले होते.फोनमधील स्फोटांच्या घटनांमुळे अनेकजण जखमी झाले होते. याशिवाय कंपनीने प्रमुख स्मार्टफोन हॅडसेटचे उत्पादन थांबवलं होतं.
3/5
यानंतर विमान प्राधिकरणाने शनिवारी सर्व एअरलाईन्सना सॅमसंग गॅलेक्सी नोट-7 घेऊन प्रवास करण्यावर तत्काळ बंदी घालण्याच्या सुचना दिल्या.
4/5
जपानच्या परिवहन मंत्रालयाने गेल्या आठवड्यात यासंबंधीचे आदेश दिले. यापूर्वी विमान प्रवाशांना विमानात स्मार्टफोन चार्ज करण्यावर बंदी घातली होती.
5/5
जपानने आपल्या देशातील सर्व एअरलाईन्सना विमानांमधून सॅमसंगचा गॅलेक्सी नोट-7 घेऊन प्रवास करण्यावर बंदी घातली आहे. अमेरिकासहित इतर देशांनी सॅमसंग गॅलेक्सीसोबत प्रवास करण्यावरुन बंदी घातल्यानंतर जपाननेही असा निर्णय घेतल्याने सॅमसंग गॅलेक्सी नोट-7 यूजर्सची मोठी पंचाईत झाली आहे.