Phone Launched: फ्लिप फोन Motorola Razr 40 आणि Razr 40 Ultra लॉन्च; लूक आणि फिचर्स आहेत दमदार
New Phone Launched: Motorola कंपनीने आता फ्लिप स्मार्टफोनची सिरीज लाँच केली आहे. यात सुरुवातीला दोन फोन कंपनीने लाँच केले आहेत.
Motorola Razr 40 Series Launch: मोटोरोला कंपनीने भारतात आपले दोन नवीन फ्लिप फोन (Flip Phone) नुकतेच लाँच केले आहेत. Motorola Razr 40 सिरीजमधील Motorola Razr 40 आणि Motorola Razr 40 Ultra असं या स्मार्टफोनच्या मॅाडेल्सचं नाव आहे. हे मोटोच्या प्रीमियम फ्लॅगशिप कॅटेगरीमध्ये आले आहेत. सोमवारी (3 जुलै) हे फोन भारतात लाँच झाले आहेत. या दोन्ही फोनची थेट टक्कर Oppo Find N2 Flip आणि Galaxy Z Flip 4 या फोन्ससोबत होणार आहे. या दोन्ही फ्लिप फोन Amazon वर उपलब्ध होणार आहेत. मोटोरोलाचे (Motorola) हे फ्लिप फोन ऑफलाईन स्टोअर्सवरही विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या दोन्ही फोनच्या किमती आणि फिचर्स पाहूया...
Motorola Razr 40 सिरीजची किंमत आणि उपलब्धता
Motorola Razr 40 Ultra या फोनची किंमत कंपनीने 89,999 रुपये इतकी ठेवली आहे. तर, Motorola Razr 40 ची किंमत 59,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या दोन्ही फोनची विक्री भारतात अॅमेझॉनसह रिलायन्स डिजिटलवर केली जाईल. फोनसाठी युजर्सना डिस्काऊंट ऑफर देखील दिली जात आहे. अल्ट्रा मॉडेलवर ICICI बँक कार्डधारकांना 7,000 रुपयांपर्यंतची सूट आणि बेस मॉडेलवर 5,000 रुपयांचा डिस्काऊंट मिळणार आहे.
Motorola Razr 40 Ultra चे फिचर्स
मोटोरोला रेझर 40 अल्ट्रा हा सर्वात सडपातळ फ्लिपेबल स्मार्टफोन आहे. इतर फ्लिप फोनच्या तुलनेत या फोनला सर्वात मोठा एक्स्टर्नल डिस्प्ले आहे. या फोल्डेबल फोनमध्ये 6.9 इंचाचा pOLED डिस्ले आहे. तसेच दुसरा डिस्प्ले 3.6 इंचाचा आहे. युजर्स या मोठ्या एक्स्टर्नल डिस्प्लेवर मेसेजेसना प्रतिसाद देऊ शकतात, सेल्फी घेऊ शकतात, गेम्स खेळू शकतात, स्पॉटिफायवर गाणी ऐकू शकतात आणि यूट्यूबवर व्हिडिओज पाहण्याचा आनंद घेऊ शकतात. तसेच या डिस्प्लेवर कॉर्निंग, गोरिला ग्लास प्रोटेक्शन आहे. हा डिवाइस आणि दमदार ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 चिपसेटसह आला आहे. स्टोरेजच्या बाबतीत फोन 12GB रॅम + 512GB स्टोरेजसह येतो.
मोटोरोला रेझर 40 अल्ट्रा हा ड्युएल कॅमेरा फोन आहे, यात LED फ्लॅशसह 12MP मेन कॅमेरा आणि 13MP ची अल्ट्रा वाइड लेन्स आहे. तसेच या फोनमध्ये सेल्फी, व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रन्ट कॅमेरा आहे. मोटोरोलाच्या या फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंगसह 3,800mAh बॅटरी आहे, जी वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करते. या फोनचे ऑपरेटिंग सिस्टम डिवाइस अँड्रॉइड 13 वर चालते. या फोनमध्ये ड्युअल-सिम 5जी, वाय-फाय 6, एनएफसी, ब्लूटूथ वी5.3 सारखे फीचर्स मिळतात.
Motorola Razr 40 चे फिचर्स
या फोनमध्ये अल्ट्रा मॉडेलसारखाच डिस्प्ले आणि सॉफ्टवेअर फिचर्स आहेत. पण यात Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसर असून कॅमेरा फिचर्स अधिक दमदार आहेत. यात 64 MP चा मुख्य कॅमेरा आहे आणि 13 MP ची अल्ट्रा वाइड लेन्स आहे. सेल्फीसाठी 32 MP चा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनची बॅटरीही मोठी असून 4,200mAh इतकी आहे. या फोनमध्ये 12GB रॅम + 256GB स्टोरेज मिळते.
हेही वाचा: