एक्स्प्लोर

Iphone 15 Series: अ‍ॅपल कंपनी आयफोन 15 सीरिजचं उत्पादन वाढवणार; यंदा स्टॉक संपण्याची भीती नाही

Iphone 15: अ‍ॅपल आयफोन 15 येत्या काही महिन्यात लॉन्च होणार आहे. यासाठी कंपनीने झेंग्झूमध्ये चाचणी, उत्पादन सुरू केलं आहे. फॉक्सकॉन आणि अ‍ॅपल यंदा मोठ्या प्रमाणात आयफोन बनवणार आहे.

Iphone 15 Series: अ‍ॅपल कंपनी सप्टेंबर 2023 मध्ये iPhone 15 सिरीज लॉन्च करणार आहे. iPhone 15 बाजारात आल्यानंतर त्याचा मोठ्या प्रमाणात खप होणार असल्याचा अंदाज आताच वर्तवण्यात येतोय, त्याच्या पूर्वतयारीसाठी कंपनी यंदा मोठ्या प्रमाणात आयफोनचं (iPhone) उत्पादन सुरू करत आहे. बहुप्रतीक्षित आयफोनच्या सीरिजबद्दल आतापर्यंत अनेक रुमर्स पसरले असून अनेक फिचर्सही लीक झाले आहेत. उदाहरणार्थ, अ‍ॅपलचा हा नवा आयफोन 14 प्रो आणि प्रो मॅक्स या फोनच्या डिझाइनला एकत्र करुन बनवला जाईल आणि iPhone 15 सीरिजची किंमत आधीच्या आयफोनपेक्षा जास्त असेल, अशीही माहिती याआधी समोर आली आहे.

आता फॉक्सकॉन चीनमधील झेंग्झूमध्ये आयफोनचं चाचणी उत्पादन सुरू करत आहे. या महिन्याच्या अखेरीस उत्पादनाची चाचणी संपेल आणि मोठ्या प्रमाणात आयफोनचं उत्पादन सुरू होणार आहे.

अहवालानुसार, अ‍ॅपलला 9 कोटींपर्यंत आयफोन 15 सीरिजचे फोन स्टॉकमध्ये ठेवायला लागणार आहेत. अ‍ॅपल कंपनी प्रो मॉडेलचे सर्वाधिक उत्पादन करणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कंपनीने अलीकडेच उत्पादन आणि पुरवठ्याची मागणी पूर्ण करण्यासाठी नवीन कर्मचार्‍यांसाठी मोबदला रकमेत (Incentives) वाढ केली आहे. शेन्झेन लक्सशेअर प्रिसिजन हा फॉक्सकॉन व्यतिरिक्त नवीन लाईनअपचा आणखी एक विक्रेता असेल.

कसा असणार iPhone 15?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयफोन 15 सीरिजचे (iPhone 15 Series) मोबाईल फोन हे आयफोन 14 प्रो (iPhone 14 Pro)आणि प्रो मॅक्स (iPhone 14 Pro Max) व्हेरियंटच्या डिझाइनची संमिश्र कॉपी असतील. यामध्ये टायटॅनियम फ्रेम, फ्लॅट-एज डिझाइन यांचा समावेश असू शकतो. याशिवाय, 15 सीरिजमध्ये अधिक प्रगत कॅमेरे देण्यात येतील. यात ऑटोफोकससह नवीन फ्रंट-फेसिंग कॅमेरा, पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स आणि 48MP मुख्य कॅमेरा असू शकतो. 

नवीन A17 बायोनिक प्रोसेसर आयफोन 15 सीरिजला आणखी मजबूत करेल असा अंदाज आहे. ही चिप A16 बायोनिक प्रोसेसरपेक्षा मोठ्या प्रमाणावर कार्यक्षमता बजावू शकते. हा फोन कदाचित USB-C चार्जिंग पोर्टसह उपलब्ध केला जाऊ शकतो.

iPhone 15 च्या सीरिजची किंमत किती असेल?

आयफोन 15 ची सर्वसाधरणपणे किंमत ही 80,000 हजार रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. तर, आयफोन 15 प्रो या मॉडेलची किंमत 1,30,000 रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. जेव्हा आयफोन 14 भारतात लॉन्च झाला, तेव्हा त्याची किंमत 79,900 रुपये होती. तर आयफोन 14 प्रो या मॉडेलची किंमत ही 1,29,000 हजार रुपये इतकी होती.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Jio Bharat Phone: अवघ्या 999 रुपयांत जिओने आणला 4G फोन; महिन्याचा रिचार्ज फक्त 123 रुपयांत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget