एक्स्प्लोर

AI for Earning : क्रिप्टोमध्ये गमावली आयुष्यभराची कमाई; पण AI च्या माध्यमातून कमावले कोट्यवधी रुपये

एआयने एका तरुणाचं आयुष्य बदलून टाकलंय. सायप्रस देशातील तरुणाने एआयच्या मदतीने तब्बल एक कोटींहून अधिक रुपये कमावले आहेत.

Earning From AI : आपल्याला माहितीच आहे आजकाल AI आणि क्रिप्टोकरन्सीबद्दल (Cryptocurrency). मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.  AI  सारख्या नवीन तंत्रज्ञानामुळे अनेकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात असे ऐकायला मिळाले आहे. पण याच एआयने एका तरुणाचं आयुष्य बदलून टाकलंय. सायप्रस देशातील तरुणाने एआयच्या मदतीने तब्बल एक कोटींहून अधिक रुपये कमावले आहेत. 

तर ही गोष्ट आहे 32 वर्षांच्या ओले लेहमॅन नावाच्या तरुणाची. गेली अनेक वर्ष हा तरूण क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करून पैसे कमवत होता. स्वत:चा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह तो क्रिप्टोच्या साहाय्यानेच करत होता. मात्र, 11 नोव्हेंबर 2022 रोजी, एफटीएक्स (FTX) क्रॅश झालं. यामुळे या तरुणाने जवळपास आपली आयुष्यभराची कमाई क्रिप्टोमध्येच गमावली.

AI च्या साहाय्याने कमावले कोट्यवधी रूपये (Crores Of Rupees Earned With The Help Of AI)

एफटीएक्स क्रॅश झाल्यानंतर बरेच दिवस आता नेमके काय करावे या विचारात असतानाच ओले लेहमॅनला AI विषयी माहिती मिळाली. त्याने AI संबंधीत शक्य तेवढी जास्त माहिती मिळवायला सुरुवात केली. याबाबत थोडाफार अभ्यास केल्यानंतर, जानेवारी 2023 मध्ये लेहमॅनने एक एक्स (ट्विटर) अकाउंट सुरू केलं. या अकाउंटवरुन तो एआयबाबत टिप्स (Tips) आणि माहिती पोस्ट करत होता. त्याला हे काम करण्यात मजा येऊ लागली त्यामुळे कालांतराने एप्रिलमध्ये त्याने 'The AI ​​Solopreneur' नावाने आणखी एक ट्विटर अकाउंट सुरू केले. या अकाउंटच्या साहाय्याने तो बऱ्याच उद्योजकांना आपलं प्रॉडक्शन (Production) वाढवण्यासाठी एआयचा (AI) वापर कसा करता येईल याबाबत टिप्स देण्यास सुरुवात केली. लोकांना याचा फायदा होऊ लागला. लोकांना या टिप्स आवडल्या आणि अवघ्या 65 दिवसांत त्याचे 100,000 फॉलोअर्स झाले.

सुरू केला कोर्स

AI मधील लोकांची वाढती आवड पाहून, ओले लेहमॅनने 'AI Audience Accelerator' नावाचा कोर्स (Course) सुरू केला. हा नवीन आणि लहान उद्योजकांच्या मदतीसाठी कोर्स होता. या कोर्सची किंमत 179 डाॅलर इतकी होती. हा कोर्स तब्बल 1,078 लोकांनी विकत घेतला. अशा प्रकारे ओले लेहमॅनने एका महिन्यातच 1 कोटींवर कमाई केली आहे. 

इतर महतत्वाच्या बातम्या : 

Dhule E Bike : वडील रिक्षाचालक तर आई शेतमजूर, धुळ्याच्या पोरानं नाव काढलं; बनवली जबरदस्त इलेक्ट्रिक बाइक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Guardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोपABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6 PM : 27 Jan 2025 : ABP MajhaSaif Ali Khan :बदनामीचा सामना करावा लागतोय,सैफ हल्ला प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं लग्न मोडलंBaburao Chandere : Vijay Raundal यांनी पोकलेनच्या ड्रायव्हरला दगड मारले,बाबूराव चांदेरे यांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Saif Ali khan: सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
Embed widget