iQOO Z7 चा टीझर आला समोर आला, अशी असेल डिझाइन; इतकी असू शकते किंमत
iQOO Z7: मोबाईल उत्पादक कंपनी IQ लवकरच भारतात आणखी एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनीने नुकतेच iQOO 11 आणि iQOO Neo 7 स्मार्टफोन लॉन्च केले आहेत.
![iQOO Z7 चा टीझर आला समोर आला, अशी असेल डिझाइन; इतकी असू शकते किंमत iQOO Z7 smartphone officially teased India launch expected soon Tech News In Marathi iQOO Z7 चा टीझर आला समोर आला, अशी असेल डिझाइन; इतकी असू शकते किंमत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/25/69a633de59e5072dc323f4a919edc5ec1677347057520384_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
iQOO Z7: मोबाईल उत्पादक कंपनी IQ लवकरच भारतात आणखी एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनीने नुकतेच iQOO 11 आणि iQOO Neo 7 स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. कंपनी फक्त 2 स्मार्टफोनवर थांबणार नाही आणि लवकरच कंपनी एक नवीन फोन म्हणजेच iQOO Z7 लॉन्च करणार आहे. हा फोन Z6 सीरीजचा एक भाग म्हणून कंपनी लॉन्च करू शकते. आयक्यू इंडियाचे सीईओ निपुण मार्या यांनी ट्विटरद्वारे iQOO Z7 सीरीजचा टीझर पोस्ट केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी मार्चमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च करू शकते.
डिझाइन
iQOO Z7 चा टीझरमध्ये दिसत आहे की या स्मार्टफोनला LED फ्लॅशसह मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल. मोबाईलच्या खालच्या भागात आयक्यू ब्रँडिंग आढळू शकते. हा स्मार्टफोन काही प्रमाणात Vivo T1x सारखा दिसतो. तुम्हाला iQOO Z7 मध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा मिळू शकतो.
iQOO Z6 स्पेसिफिकेशन
iQOO Z6 मध्ये ग्राहकांना फुल एचडी प्लस रिझोल्यूशनसह 6.5-इंचाचा IPS LCD डिस्प्ले मिळतो. जो 120hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. मोबाईल फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 SoC वर काम करतो. ज्यामध्ये तुम्हाला 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळते. iQOO Z6 मध्ये तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि दुसरा 2-मेगापिक्सेल सेन्सर आहेत. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16-मेगापिक्सेल कॅमेरा फ्रंटमध्ये उपलब्ध आहे.
Let the craZe begin!
— Nipun Marya (@nipunmarya) February 24, 2023
Dropping another hint of the Zeisty ‘🆉’ coming your way. If you have already figured it out, drop your guess in the comments below. We will give a big shout-out to the correct responses. #FullyLoaded #iQOO #ComingSoon pic.twitter.com/45oJacOTWA
किती असेल किंमत?
IQ ने अधिकृतपणे मोबाईल फोनची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही. पण इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार, iQOO Z7 15 ते 20,000 रुपयांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. मोबाईल फोन लॉन्च झाल्यानंतरच नेमकी माहिती समोर येईल.
Vivo V27 सीरीज 1 मार्च रोजी होणार लॉन्च
चीनी मोबाईल फोन निर्माता Vivo 1 मार्च रोजी जागतिक स्तरावर Vivo v27 मालिका लॉन्च करणार आहे. या सीरीज अंतर्गत कंपनी 3 फोन लॉन्च करेल. ज्यात Vivo v27, Vivo v27pro आणि Vivo v27e यांचा समावेश आहे. या तीन मोबाईल फोनमध्ये तुम्हाला 67 वॉट फास्ट चार्जिंगसह 4500 mAh बॅटरी मिळू शकते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)