Cheapest Iphone 16 Pro Max: आयफोन-16 प्रो च्या किंमतीत मोठी घसरण, फ्लिपकार्टच्या बिग बिलियन सेलमध्ये किती रुपयांना मिळतोय?
IPhone Price: आयफोन 17 लाँच झाल्याने आयफोन 16 मॉडेलची किंमत कमी झाली आहे. प्रो मॉडेलही सध्या स्वस्तात मिळत आहे. फ्लिपकार्टवर आयफोनची किंमत किती?

iPhone 16 Pro price fall: नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून अनेक ऑनलाईन संकेतस्थळांवर सेल सुरु झाले आहेत. यामुळे आयफोनच्या 16 प्रो मॉडेलच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. काही दिवसांपूर्वी अॅपल कंपनीकडून आयफोन 17 (Iphone 17) सिरीजमधील मॉडेल आणि इतर गॅझेट्सचे लॉचिंग करण्यात आले होते. आयफोनचे कोणतेही नवे मॉडेल लाँच होते त्यावेळी जुन्या मॉडेलच्या फोनच्या किंमतीत मोठी घसरण पाहायला मिळते. त्यामुळे आता आयफोन 17 लाँच झाल्यानंतर आयफोन 16 प्रो मॉडेलची(Iphone 16 Pro) किंमत घसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक ई-कॉमर्स संकेतस्थळांवर आणि रिटेल आऊटलेटसमध्ये आयफोन 16 मॉडेलची किंमत कमी झाली आहे. मात्र, फ्लिपकार्टकडून आयफोन 16 प्रो या मॉडेलवर सर्वात जास्त सूट दिली जात आहे. (Flipkart big billion Sale)
आजपासून फ्लिपकार्टचा बिग बिलियन डे सेल सुरु झाला आहे. यापूर्वी 2024 मध्ये आयफोन 16 प्रो मॉडेल लाँच झाले त्यावेळी मोबाईलची किंमत 1,19,000 इतकी होती. मात्र, सध्या विविध ई-कॉमर्स वेबसाईटवर सुरु असणाऱ्या सेलमुळे या मॉडेलची किंमत कमी झाली आहे. बिग बिलियन सेलमध्ये हा मोबाईल फोन 74 हजार 900 रुपयांना मिळत आहे. तर अन्य ई-कॉमर्स संकेतस्थळांवर आयफोन 16 प्रो मॉडेलच्या खरेदीवर अनेक ऑफर्स आणि मोठ्या कॅशबॅकची सुविधा दिली जात आहे.
तर अॅपल स्टोअर्समध्ये सध्या आयफोन 16 मॉडेलची (Iphone 16) किंमत 69,999 रुपयांपर्यंत खाली आली आहे. लाँचिंगच्यावेळी आयफोन 16 मॉडेलची किंमत 79,999 इतकी होती. तर फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डे सेलमध्ये आयफोन 16 मॉडेलची किंमत 35 टक्क्यांनी खाली घसरली आहे. फ्लिपकार्टवर आयफोन 16 मॉडेलची किंमत 51,999 इतकी आहे. याशिवाय, फ्लिपकार्टडून आणखी कॅशबॅक आणि इतर ऑफर्स देण्यात आल्याने आयफोन 16 मोबाईल फोन तुम्हाला खूप कमी किंमतीत मिळू शकतो. येत्या काही दिवसांमध्ये अॅमेझॉनचा 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' हा सेल आहे. या सेलमध्ये आयफोनच्या किंमती किती कमी होतील, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, आयफोन 16 आणि आयफोन 16 प्रो या दोन मॉडेल्सची किंमत खाली घसरु शकते.
आणखी वाचा
ॲपलचा धमाका! iPhone 17 आणि AirPods Pro 3 लॉन्च, जबरदस्त फीचर्स, जाणून घ्या सविस्तर माहिती
अवघ्या 2,496 रुपयांत मिळवा आयफोन 16e, किंमतीवर 67 हजारांपर्यंत सूट, अॅपलची भन्नाट ऑफर काय?
























