एक्स्प्लोर

What Is Juice Jacking : एकीकडे फोन फुल्ल चार्ज अन् दुसरीकडे खिसा थेट रिकामा; सायबर भामट्यांना नवा फंडा, Juice Jacking प्रकरण नेमकं आहे तरी काय?

तुम्हीही प्रवासादरम्यान मोबाईल चार्ज करत असाल आणि तेही USB केबलचा वापर करुन मोबाईल चार्ज करत असाल तर थांबा. एकीकडे तुम्ही मोबाईल चार्ज कराल अन् दुसरीकडे तुमचा खिसा खाली होत राहिल. ते कसं पाहुयात...

What Is Juice Jacking :  सध्या सगळीकडेच सायबर क्राईमचं (cyber crime) प्रमाण वाढलं आहे. अनेकांचे पैसे या सायबर क्राईममुळे लुटले जात आहे. सायबर क्राईमचे नवनवे फंडे रोज सायबर भामटे वापरताना दिसतात. त्यातच आता पैसे लुटण्याचा नवा फंडा समोर आला आहे. आपल्यातील प्रत्येकजण बसने किंवा ट्रेनने प्रवास करतोच. याच प्रवासादरम्यान आपल्या कंटाळा येऊ नये म्हणून मोबाईलचा वापर करतो. त्यातच या प्रवासादरम्यान मोबाईल देखील चार्ज करतो.तुम्हीही प्रवासादरम्यान मोबाईल चार्ज करत असाल आणि तेही USB केबलचा वापर करुन मोबाईल चार्ज करत असाल तर थांबा. एकीकडे तुम्ही मोबाईल चार्ज कराल अन् दुसरीकडे तुमचा खिसा खाली होत राहिल. ते कसं पाहुयात...

सध्या सायबर गुन्ह्यांचे अनेक प्रकार समोर आले आहेत. सेक्स्टॉर्शन, एक्स्टॉर्शन, हॅकींग अशाच प्रकारचा आता ज्यूस जॅकींग हा सायबर हल्ल्याचा प्रकार समोर आला आहे. या ज्यूस जॅकींग सायबर हल्ल्यामुळे आतापर्यंत अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे. साधा सोपा मोबाईल चार्ज करण्याच्या नादात अनेकांनी आयुष्यभराची पुंजी गमावली आहे. 

काय आहे ज्यूस जॅकींग?

ज्यूस जॅकिंग हा एक सायबर हल्ला आहे जिथे सार्वजनिक USB चार्जिंग पोर्ट डेटा चोरण्यासाठी किंवा डिव्हाइसवर मालवेअर स्थापित करण्यासाठी वापरला जातो. ज्यूस जॅकिंग हल्ल्यांमुळे हॅकर्स वापरकर्त्यांचे पासवर्ड, क्रेडिट कार्ड माहिती, पत्ते, नावे आणि इतर डेटा चोरू शकतात. ते कीस्ट्रोक ट्रॅक करण्यासाठी, जाहिराती दाखवण्यासाठी किंवा बॉटनेटमध्ये डिव्हाइस जोडण्यासाठी मालवेअरदेखील स्थापित करू शकतात.

ज्यूस जॅकींग कसं काम करतं?

तुम्ही जेव्हा प्रवास करताना मोबाईल चार्ज करण्यासाठी सॉकेटचा वापर न करता USB केबलचा वापर करता. त्याचवेळी सायबर भामटे याचा फायदा घेतात. साधारणपणे बघितलं तर USB केबलचा वापर आपण डेटा ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असतो. याच केबलने मोबाईलदेखील चार्ज होतो. त्यामुळे USB केबलचा वापर करुन मोबाईल चार्जिंगला लावतो. त्यावेळी आपला सगळा डेटा सायबर भामट्यांकडे जातो. त्यात आपले डिटेल्सदेखील जातात. ATMचे डिटेल्सदेखील सायबर भामट्यांमा कळतात आणि मोबाईल चार्ज करता करता सायबर भामटे आपला खिसादेखील खाली करत असतात. आतापर्यंत कोलकाता, हैद्राबाद यासारख्या अनेक शहरांत अशा प्रकारचे गुन्हे समोर आले आहेत.

स्वत:चा बचाव कसा कराल?

अमेरिकेच्या इंडीपेंडेंट एजेंसी फेडरल कम्यूनिकेशन कमीशन यांमी ज्यूस जॅकींग संदर्भात सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे आणि त्यांनी या ज्यूस जॅकींगपासून सावधान राहण्यासाठी काही टीप्स दिल्या आहेत. चार्जिंग करत असताा आपल्या मोबाईलवर प़ॉपअप येईल त्यावेळी share data न करता Charge Only हे ऑप्शन निवडा.

कुठे कुठे होऊ शकतो हा हल्ला?

 फेक चार्जिंग स्टेशन,  बस स्टॉप, रेल्वे स्टेशन आणि एयरपोर्टवर अशा प्रकारचे चार्जिंग पॉईंट्स असतात. त्यामुळे या ठिकाणी तुमच्या ज्यूस जॅकींगचा हल्ला होऊ शकतो. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Sara Tendulkar : 'गिल'दा मामला अन् सारा तेंडुलकरचं रात्रीस खेळ चाले! थेट 12th फेल डायरेक्टरच्या घरी सारानं घेतली शुभमनची भेट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget