(Source: ECI/ABP News/ABP Majha)
50MP कॅमेरासह Infinix Note 12i लॉन्च, किंमत फक्त 10 हजार; जाणून घ्या फीचर्स
Infinix Note 12i : स्मार्टफोन बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कंपनी Infinix ने आपला नवीन स्मार्टफोन Infinix Note 12i भारतीय बाजारात लॉन्च केला आहे.
Infinix Note 12i : स्मार्टफोन बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कंपनी Infinix ने आपला नवीन स्मार्टफोन Infinix Note 12i भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. या फोनसह कंपनीने आपल्या नोट लाइनअपचा विस्तार केला आहे. नोट लाइनअपचा नवीन फोन MediaTek Helio G85 SoC सह येतो. स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर यात 4GB रॅम आणि 64GB इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे. आता फोटो आणि व्हिडीओंबद्दल बोलायचे झाले तर यात 50-मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच यातड्युअल एलईडी फ्लॅशसह 8-मेगापिक्सेल कॅमेरा त्याच्या समोर उपलब्ध आहे. या स्मार्टफोनबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...
Infinix Note 12i : किंमत आणि ऑफर
हा फोन 3 रंगांमध्ये सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये काळा, निळा आणि पांढरा समावेश आहे. Infinix Note 12i फ्लिपकार्टवर 9,999 रुपयांना विक्रीसाठी सूचीबद्ध आहे. यावरील ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, कंपनी Jio सोबत 1,000 रुपयांचा कॅशबॅक देखील देत आहे. ज्याचा लाभ 30 दिवसांच्या आत घेता येईल. याचा अर्थ असा की जर तुम्ही फोनमध्ये Jio सिम वापरत असाल तर तुम्हाला 1,000 रुपये कॅशबॅक मिळेल. यातच तुम्ही हे देखील लक्षात ठेवावे की, एकदा तुम्हाला कॅशबॅक मिळाल्यावर, फोन Jio नेटवर्कवर 30 महिन्यांसाठी लॉक केला जाईल आणि तुम्ही दुसऱ्या नेटवर्कवर स्विच करू शकणार नाही.
Infinix Note 12i : स्पेसिफिकेशन
Infinix Note 12i मध्ये 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले, 60Hz रिफ्रेश रेट आणि 1000 nits पर्यंत पीक ब्राइटनेस आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity G85 SoC आणि Mali G52 GPU देण्यात आले आहेत. फोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB अंतर्गत स्टोरेज आहे. जे microSD कार्डद्वारे 512GB पर्यंत वाढवता येते. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर हा फोन Android 12 वर आधारित XOS 12 वर काम करतो.
Infinix Note 12i : कॅमेरा आणि बॅटरी
कॅमेर्याबद्दल बोलायचे झाले तर, यात 50 MP मुख्य कॅमेरा आणि 2 MP दुसरा कॅमेरा आहे. त्याचबरोबर समोर 8 MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Infinix Note 12i मध्ये 5,000mAh बॅटरी आहे. जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, डीटीएस ऑडिओ सपोर्टसह स्टिरिओ स्पीकर, ब्लूटूथ 5.0 आणि 3 जीबी व्हर्च्युअल रॅम आहे.
हेही वाचा: