एक्स्प्लोर

Sundar Pichai: AI अब्जावधी लोकांचं आयुष्य सुधारू शकतो, सर्वांना उपयुक्त बनवण्यासाठी आपल्याला धाडसी पावलं उचलावी लागतील; AI भीतीवर गुगल सीईओ सुंदर पिचाईंनी कोणता कानमंत्र दिला?

Sundar Pichai on AI: आपल्याकडे पिढीमध्ये एकदाच मिळणारी आयुष्य सुधारण्याची संधी आहे, आता आपण सर्वांनी मिळून हे काम केले पाहिजे, असे आवाहन सुंदर पिचाई यांनी केले. 

Sundar Pichai on AI: आपण हायपर प्रोग्रेसच्या (hyper progress) उंबरठ्यावर आहोत. एआय प्रत्येकासाठी उपयुक्त बनवण्यासाठी त्याचा धैर्याने (boldly) पाठपुरावा करणे, जबाबदारीने (responsibly) दृष्टिकोन ठेवणे आणि या निर्णायक क्षणी एकत्र काम करणे, गरजेचं असल्याचे मत गुगल सीईओ सुंदर पिचाई यांनी व्यक्त केले. त्यांनी राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या एआय समिटमध्ये आज संबोधित करताना एआय आव्हान स्वीकारण्यासाठी कानमंत्र दिला. एआय केवळ तंत्रज्ञान नाही तर विज्ञानातील कठीण प्रश्न सोडवण्याचे साधन आहे. गुगल डीपमाइंडने एआयचा वापर करून 'प्रोटीन स्ट्रक्चर्स'चे भाकीत करण्याचे 50 वर्षांचे आव्हान सोडवले, ज्यासाठी नोबेल पारितोषिकही मिळाले. ही माहिती आता जगासाठी खुली करण्यात आली असून ३ दशलक्ष संशोधक याचा वापर करत असल्याचे ते म्हणाले. एआयचे पूर्ण फायदे मिळवण्यासाठी सरकार आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे. सरकारांनी केवळ नियामक (regulators) म्हणून नाही तर नाविन्यपूर्ण बदल घडवून आणणारे (innovators) म्हणूनही काम केले पाहिजे. आपल्याकडे पिढीमध्ये एकदाच मिळणारी आयुष्य सुधारण्याची संधी आहे, आता आपण सर्वांनी मिळून हे काम केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. 

स्टॅक एआय हब' (full stack AI hub) स्थापन करणार 

भारतातील पायाभूत सुविधा आणि गुंतवणूकीसंदर्भात पिचाई यांनी जाहीर केले की, गुगल विशाखापट्टणमला एक 'फुल स्टॅक एआय हब' (full stack AI hub) स्थापन करत आहे. हा भारतातील त्यांच्या 15 अब्ज डॉलर्सच्या पायाभूत सुविधा गुंतवणुकीचा एक भाग आहे. या हबमध्ये 'गिगावाट-स्केल कॉम्प्युट' आणि नवीन 'आंतरराष्ट्रीय सबसी केबल गेटवे' असेल, ज्यामुळे संपूर्ण भारतात नोकऱ्या आणि प्रगत एआय तंत्रज्ञान उपलब्ध होईल, असे पिचाई यांनी सांगितले. 

भारतातील शेतकऱ्यांना मदत

ते म्हणाले की,  भारतात गुगल सरकारसोबत काम करत असून, गेल्या उन्हाळ्यात पहिल्यांदाच लाखो शेतकऱ्यांना एआय-आधारित पावसाचा अंदाज (forecasts) पाठवण्यात आला.  हे 'न्यूरल जीसीएम मॉडेल' (neural GCM model) मुळे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, तंत्रज्ञानाचा फायदा सर्वांना मिळावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. पिचाई यांनी स्पष्ट केले की, आम्ही डिजिटल दरीचे रूपांतर 'एआय दरी'मध्ये होऊ देऊ शकत नाही. यासाठी कनेक्टिव्हिटीवर भर देत असून, भारत आणि अमेरिका दरम्यान 'अमेरिका इंडिया कनेक्ट' उपक्रमांतर्गत चार नवीन सबसी फायबर ऑप्टिक केबल सिस्टीम तयार करत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. एआयमुळे कामाच्या स्वरूपात बदल होईल, काही भूमिका स्वयंचलित होतील तर काही नवीन करिअर निर्माण होतील. यासाठी गुगलने 100 दशलक्ष लोकांना डिजिटल कौशल्यांचे प्रशिक्षण दिले आहे आणि नवीन 'गुगल एआय प्रोफेशनल सर्टिफिकेट'लाँच केले आहे. एआयच्या वापरामध्ये विश्वास महत्त्वाचा आहे. माहितीची सत्यता पडताळण्यासाठी गुगलने 'सिंथ आयडी' सारखी साधने तयार केली आहेत, जी पत्रकार आणि नागरिक वापरू शकतात, असे त्यांनी सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget