पासवर्ड सेफ ठेवण्यासाठी तुम्ही 'या' अॅपचा वापर तर नाही करत? संपूर्ण डेटा होऊ शकतो लीक
अनेक लोक त्यांचे महत्त्वाचे पासवर्ड सेव्ह करण्यासाठी पासवर्ड मॅनेजर अॅप्स वापरतात. IIT हैदराबादच्या संशोधकांनी पासवर्ड मॅनेजर अॅप्सबाबत एक मोठा खुलासा केला आहे.
मुंबई : या डिजिटल युगात पासवर्ड (Password) आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. चुकून कुणाला ही गोष्ट कळली तर आपली वर्षभराची मेहनत, कमाई वगैरे वाया जाऊ शकते. म्हणजेच हॅकर्स पासवर्ड चोरून सर्व पैसे चोरू शकतात आणि वैयक्तिक डेटाचाही गैरवापर करू शकतात. दरम्यान, आयआयटी हैदराबादच्या काही संशोधकांनी पासवर्ड मॅनेजर अॅप्सबाबत इशारा दिला आहे. संशोधकांनी सांगितले की काही लोकप्रिय अँड्रॉइड पासवर्ड मॅनेजर अॅप्स लोकांचा वैयक्तिक डेटा लीक करत आहेत.
संशोधकांनी सांगितले की काही लोकप्रिय अँड्रॉइड पासवर्ड मॅनेजर अॅप्स लोकांचा वैयक्तिक डेटा लीक करत आहेत. तुमचे पासवर्ड सेव्ह करण्यासाठी तुम्हीही हे अॅप्स वापरत असाल तर ते लगेच डिलीट करा. अनेकजण आपलं कोणतंही डिवाईस सुरक्षित ठेवण्यासाठी पासर्वडचा वापर करतात. त्यामुळे कोणालाही तुमचं फोन किंवा लॅपटॉप सहज उघडता येत नाही. पण त्यासाठी काही जण काही अॅप्स वापरतात. पण बऱ्याचदा तेच अॅप्स तुमच्या फोनसाठी किंवा लॅपटॉपसाठी धोकादायक ठरु शकतात.
'हे' अॅप्स तात्काळ करा डिलीट
संशोधकांनी सांगितले की काही लोकप्रिय अँड्रॉइड पासवर्ड मॅनेजर अॅप्स लोकांचा वैयक्तिक डेटा लीक करत आहेत. तुमचे पासवर्ड सेव्ह करण्यासाठी तुम्हीही हे अॅप्स वापरत असाल तर ते लगेच डिलीट करा.
अॅपल, Facebook, Microsoft किंवा Google सारख्या सेवांसाठी अॅप लॉगिन पृष्ठ लोड करते तेव्हा, Android वरील पासवर्ड व्यवस्थापक अॅप्स वापरकर्त्यांचे खाते क्रेडेंशियल स्वयंचलितपणे टाइप करण्यासाठी आणि डेटा संचयित करण्यासाठी प्लॅटफॉर्मच्या WebView फ्रेमवर्कचा वापर करतात आणि डेटा चोरु शकतात.
1Password
1Password CTO पेड्रो कानाहुती यांनी BleepingComputer ला सांगितले, “आमच्या ग्राहकांच्या सर्वात महत्वाच्या डेटाचे संरक्षण करणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. ऑटोस्पिलसाठी एक उपाय शोधला गेला आहे आणि सध्या त्यावर काम केले जात आहे. म्हणजेच कंपनी सुरक्षा पॅचवर काम करत आहे. त्याचप्रमाणे, लास्टपास अॅपमध्ये देखील एक कमजोरी आढळली आहे. EnPass, Keepass2Android आणि Keeper सारखे अॅप देखील वापरकर्त्यांचा डेटा लीक करत आहेत.
हे 2 अॅप आहेत सुरक्षित
पासवर्ड सेव्ह करण्यासाठी Dashlane आणि Google Smart Lock अॅप्स वापरता येतात. यामध्ये कोणतीही कमजोरी आढळून आली नाही.
हेही वाचा :
Aadhaar Card : आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत वाढली; 'या' तारखेपर्यंत करू शकता अपडेट!