Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 9 डिसेंबर 2024 : ABP Majha
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 9 डिसेंबर 2024 : ABP Majha
राज्यात सध्या कोरडे आणि थंड वारे वाहू लागले आहेत. पावसाची पोषक स्थिती आता क्षीण झाली असून राज्यात कडाका वाढू लागलाय. दरम्यान, पुणेकरांना येत्या काही दिवसांत हुडहुडी भरणार आहे. राज्यातही येत्या पाच दिवसात तापमानात मोठे बदल होणार आहेत असे हवामान विभागाने नोंदवले. उत्तरेकडील राज्यांमध्ये वादळी थंड वारे वाहत आहेत. पंजाब, हरियाणामध्ये दाट धुक्याची चादर पसरली आहे. तर राजस्थानमध्ये थंडीची लाट असल्याने महाराष्ट्रात कोरडे व थंड वारे वाहत आहेत.दरम्यान, पुण्यासह आजूबाजूच्या परिसरात तापमानात घट होणार असल्याचं हवामान विभाग, पुणे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी सांगितलं.
पुणेकरांना हुडहुडी
येत्या 5 दिवसात पुणेकरांना प्रचंड गारठ्यात रहावं लागणार आहे. भारतीय हवामान विभागाचे पुणे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी X माध्यमावर याविषयी पोस्ट केली आहे. पुण्यात तापमानात येत्या पाच दिवसात कसे हवामान असणार याचा अंदाज वर्तवलाय. आज पुण्यात 13 ते 14 अंश तापमानाची नोंद केली जाण्याचा अंदाज आहे. तर येत्या काही दिवसात तापमान 11 अंशांवर जाणार असल्याचं सांगण्यात आलंय.