Cyber Alert: तुमच्या कॉम्प्युटर, लॅपटॉपमध्ये शिरू शकतो 'अकिरा' व्हायरस; सरकारने दिला धोक्याचा इशारा
Cyber Alert: तुमच्या कॉम्प्युटर, लॅपटॉपमध्ये धोकादायक समजला जाणारा अकिरा व्हायरस शुरू शकतो. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने याबाबत इशारा दिला आहे.
Cyber Alert: सध्या सायबर विश्वात ‘अकिरा’ या रॅनसमवेअर व्हायरसचा (Akira Virus) धोका वाढला आहे. या व्हायरसमुळे महत्त्वाची वैयक्तिक माहिती चोरली (Personal Data Hack) जाते, तसेच हा व्हायरस खंडणी उकळण्याच्या उद्देशाने एखाद्याचा डेटा किंवा वैयक्तिक माहिती साठवून ठेवतो. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने अर्थात सीईआरटी-इन (CERT-In) या संस्थेने कॉम्प्युटर वापरकर्त्यांना व्हायरसपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
अकिरा हा रॅनसमवेअर प्रकारातील मालवेअर सध्या विंडोज् (Windows) आणि लायनक्स (Linux) आधारित प्रणालींवर हल्ला करत आहे. यासंदर्भात सायबर हल्ले, फिशिंग आणि हॅकिंग विरोधात कार्यरत असलेल्या सीईआरटी-इन संस्थेनं म्हटलं आहे की, अकिरा सायबर स्पेसमध्ये सक्रिय झाल्याचं आढळून आलं आहे. अकिरा व्हायरस हा एका सायबर गटात काम करत आहे आणि कॉम्प्युटर, लॅपटॉपवर हल्ला करत आहे. नेटकऱ्यांनी या व्हायरसपासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या व्हायरसबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
'अकिरा' व्हायरसचा कशा प्रकारे धोका?
- व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कच्या (VPN) माध्यमातून हा व्हायरस वापरकर्त्याच्या कॉम्प्युटरमध्ये शिरतो.
- हा व्हायरस सर्मप्रथम वैयक्तिक माहिती चोरतो.
- हा व्हायरस ही माहिती वेगळ्याच किंवा एनक्रिप्टेड स्वरूपात स्वतःकडे साठवून ठेवतो.
- चोरलेल्या वैयक्तिक माहितीचा वापर करून वापरकर्त्याकडून खंडणी मागितली जाते.
- या व्हायरसचा बळी ठरलेल्या संगणक वापरकर्त्याने पैसे देण्यास नकार दिल्यास अकिरा व्हायरस पसरवणारे लोक या व्यक्तीची माहिती डार्क वेब व्लॉगवर टाकतात.
एनक्रिप्ट केल्याचे धोके काय?
- एखाद्या कॉम्प्युटरवर हल्ला केल्यावर अकिरा विंडोज शॅडो व्हॉल्युम कॉपीज पुसून टाकतो.
- अकिरा प्रत्येक फाईल वेगळ्या स्वरूपात तायर करून त्याला शेवटी ‘.akira’ हे एक्सटेन्शन लावतो.
- कार्यरत विंडोज बंद पाडल्याने अकिरा व्हायरसला प्रत्येक फाईल एनक्रिप्ट करण्यास वेळ मिळतो.
- अकिराचा हल्ला झाला आहे हे ओळखण्यासाठी प्रोग्रॅम डेटा, रिसायकल बिन, बूट, सिस्टिम व्हॉल्युम इन्फॉर्मेशन आणि विंडोजच्या फोल्डर्समध्ये ‘.akira’ या एक्सटेन्शनच्या फाइल पाहाव्यात.
व्हायरसचा धोका टाळण्यासाठी काय करावं?
- महत्त्वाच्या माहितीचा नियमित बॅकअप घ्यावा.
- घेतलेले बॅकअप सतत अपडेट करावे.
- ऑपरेटिंग सिस्टिम वेळोवेळी अपडेट करावी.
- आपला पासवर्ड पुरेसा गुंतागुंतीचा ठेवावा.
- केवळ पासवर्डवर अवलंबून राहू नये.
- एकाचवेळी अनेक पद्धतीने पासवर्ड टाकल्यानंतर पडताळणी (ऑथेन्टिकेशन) घ्यावी.
हेही वाचा: