एक्स्प्लोर

EPFO Interest Rate: कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! खात्यात जमा PF वर मिळणार जबरदस्त व्याज; वाचा सविस्तर...

EPFO Interest Rate: EPFO धारक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. चालू आर्थिक वर्षासाठी सरकारने पीएफवर 8.15 टक्के व्याजदर मंजूर केला आहे.

EPF Interest Rate: कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने (EPFO) कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. ईपीएफओने PF मधील ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. EPFO च्या प्रस्ताव स्वीकारत वित्त मंत्रालयाने PF वर आर्थिक वर्ष 2023 साठी 8.15 टक्के व्याजदर मंजूर केला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आता पीएफ खातेदाराला 8.15 टक्के दराने व्याज मिळणार आहे. यापूर्वी मार्चमध्ये 2021-22 साठी EPF वरील व्याज 8.1% या नीचांकी पातळीवर घसरलं होतं. 

पीएफ खातेदाराच्या खात्यात जमा केलेली रक्कम EPFO (Employees' Provident Fund Organisation) अनेक ठिकाणी गुंतवते आणि या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या कमाईचा एक भाग खातेदारांना व्याजाच्या स्वरूपात दिला जातो.

व्याजदर वाढीच्या प्रस्तावाला सरकारची मंजुरी

मार्चच्या सुरुवातीला झालेल्या दोन दिवसीय बैठकीत EPFO ​​ने आपल्या सदस्यांसाठी 2022-23 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) वर व्याजदर वाढवण्याची घोषणा केली होती. यानंतर, 2022-23 साठी EPF ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्यासाठी तो प्रस्ताव मंजुरीसाठी वित्त मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता आणि त्याला आज मंजुरी देण्यात आली आहे. आता सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर, 2022-23 साठी EPF वरील व्याजदर EPFO ​​च्या पाच कोटींहून अधिक खातेदारांच्या खात्यात हस्तांतरित केला जाईल.

कोट्यवधी नोकरदारांना होणार फायदा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) PF वरील व्याजदर वाढवण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. CBT ही ईपीएफओची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे आणि केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव याचे अध्यक्ष आहेत. EPF व्याजदरात वाढ झाल्यामुळे सुमारे 6 कोटी सक्रिय ग्राहकांना फायदा होणार असून यापैकी 72.73 लाख नोकरदार हे आर्थिक वर्ष 2022 मध्ये पेन्शनधारक होते.

ईपीएफओ सध्या नफ्यात

ईपीएफओकडून यंदा व्याज दरवाढ ही अपेक्षित होती. कमाईच्या बाबतीत EPFO संघटनेसाठी मागील वर्ष खूप चांगलं होतं. ईपीएफओचं उत्पन्न वाढलं असून EPFO तुमचा निधी अनेक ठिकाणी गुंतवते जिथून त्याला परतावा मिळतो. आणि याच गुंतवणुकीद्वारे संघटनेच्या सदस्यांना जमा पीएफवर व्याज मिळतं. यावेळी व्याजदर वाढवण्यामागे अनेक कारणं दिली जात होती.

कर्मचार्‍यांच्या पगारातून रक्कम केली जाते कपात

एखाद्या कर्मचाऱ्याच्या पगारातून 12% रक्कम कपात केली जाते आणि ती रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते. कर्मचार्‍यांच्या पगारातून केलेल्या कपातीपैकी 8.33% रक्कम EPS (कर्मचारी पेन्शन योजना) पर्यंत पोहोचते, तर 3.67% रक्कम EPF मध्ये जमा केली जाते. दरम्यान, तुम्ही तुमच्या पीएफ खात्याची सध्याची शिल्लक घरबसल्या सोप्या पद्धतीने तपासू शकता. यासाठी अनेक पर्याय देण्यात आले आहेत. उमंग अ‍ॅप, वेबसाइट किंवा तुमच्या मोबाईल फोनवरून एसएमएस पाठवून देखील तुम्ही पीएफ रक्कम जाणून घेऊ शकता. सध्याच्या काळात देशभरात सुमारे 6.5 कोटी कर्मचारी ईपीएफओ सदस्य आहेत.

हेही वाचा:

Gyanvapi Masjid Case: ज्ञानवापीमधील सर्वेक्षणावर 26 जुलैपर्यंत स्थगिती; सुप्रीम कोर्टाचे आदेश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Embed widget