एक्स्प्लोर

तब्बल 2,35,000 रुपये किंमत, जगातला पहिला चमत्कारिक 'ट्राय-फोल्डिंग' फोन लॉन्च,ॲपल कंपनीलाही टाकलं मागे?

सध्या एका आगळ्यावेगळ्या फोनची चर्चा होत आहे. हा फोन तब्बल दोन वेळा फोल्ड होतो. अनफोल्ड केल्यास तो लगेच टॅबमध्ये बदलतो. हा फोन चांगलाच महागडा आहे.

Huawei Mate XT Price in India: अॅपल कंपनीने 9 सप्टेंबर 2024 रोजी आयफोन 16 सिरीज लॉन्च केली. या आयफोन 16 ची गेल्या अनेक दिवसांपसून चर्चा होती. आता या फोनचे फिचर्स आणि किंमत आता समोर आली आहे. दरम्यान अॅपलने आयफोन 16 लॉन्च केल्यानंतर अवघ्या काही तासांत चीनच्या एका स्मार्टफोन कंपनीने टेक विश्वात खळबळ उडवून दिली. या कंपनीने जगातला पहिला ट्राय फोल्डिंग फोन लॉन्च केला आहे. किमतीच्या बाबतीत या कंपनीने अॅपल कंपनीच्या फोन्सना मागे टाकलं आहे. 
 
 चीमध्ये सर्वांत मोठ्या कंपन्यांमध्ये Huawei या कंपनीचे नाव घेतले जाते. याच कंपनीने जगातील पहिला ट्राय-फोल्डिंग फोन लॉन्च केला आहे. म्हणजेच हा फोन दोन न्वहे तर तीन वेळा फोल्ड होऊ शकतो. म्हणजेच तीन वेळा फोल्ड होणारा हा फोन चांगलाच मोठा आहे. भारतासह संपूर्ण जगातील बहुसंख्य लोकांना  सॅमसंग, वनप्लस, ओप्पो आदी कंपन्यांचे ड्यूअल फोल्डेबल फोन माहिती आहेत. दोन वेळा फोल्ड होणारे फोन पाहून अनेकांना आश्चर्य वाटते. पण Huawei या कंपनीने थेट तीन वेळा फोल्ड होऊ शकेल असा फोन लॉन्च केला आहे. या फोनचे नाव Huawei Mate XT असे आहे. हा फोन पूर्णपणे खोलल्यानंतर तो एका टॅबप्रमाणे दिसतो. तीन वेळा अनफोल्ड केल्यावर या फोनची स्क्रीन तब्बल 10.2 इंच होते. 

फोनची डिझाईन कशी डिस्प्ले कसा आहे? 

Huawei Mate XT या फोनमध्ये ट्राय-फोल्डिंग डिस्प्ले देण्यात आला आहे. म्हणजेच हा फोन तीन भागांत फोल्ड होतो. अनफोल्ड केल्यानंतर हा स्मार्टफोन लगेच एका टॅबमध्ये बदलत. या फोनमध्ये 6.4-इंची OLED डिस्प्ले आहे. या फोल्ड केलेल्या फोनला तुम्ही एकदा अनफोल्ड केल्यास त्या फोनची स्क्रीन 7.9 इंच होते. त्यानंतर आणखी एकदा हा फोन अपफोल्ड केल्यास या फोनची एकूण स्क्रीन 10.2 इंच होते. 

प्रोसेसर आणि परफॉर्मन्स 

कंपनीने या फोनमध्ये प्रोसेसरसाठी Kirin 9 चिपसेट दिलेला आहे. या फोनचा रॅम 16GB आहे. सोबतच हा फोन 256GB, 512GB आणि 1TB स्टोअरेजच्या ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. गेमिंग तसेच मल्टिटास्किंगसाठी हा फोन वापरता येईल, असा या कंपनीचा दावा आहे. 

सॉफ्टवेअर आणि फिचर्स काय आहेत? 

Huawei Mate XT या फोनमध्ये EMUI 13 ऑपरेटिंग सिस्टम आहे. या फोनमध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम आहे. या फोनमध्ये गुगल सर्व्हिसेसचा सपोर्ट नाही. मात्र Huawei या कंपनीने स्वत:चे अॅप्स आणि सर्व्हिसेस दिलेल्या आहेत. 

फोनचा कॅमेरा कसा आहे?  

Huawei Mate XT या फोनमध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा आहे. यातील मेन कॅमेरा हा 50MP तर 12MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. तिसरा कॅमेरा हा 12MP आहे. सेल्फी तसेच व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनला 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे. 

या फोनची बॅटरी 5600mAh आहे. Huawei Mate XT या फोनची सुरुवातीची किंमत 19,999 CNY (जवळपास 2,810 डॉलर्स) आहे. भारतीय रुपयात सांगायचे झाल्यास या फोनची किंमत तब्बल 2 लाख 35 हजार रुपयांच्या आसपास आहे. पाकिस्तानी रुपयांत सांगायचे झाल्यास हा फोन 7 लाख 82 हजार रुपयांचा आहे. हा फोन सध्यातरी चीनमध्येच उपलब्ध आहे. लवरच तो इतरही देशात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. 

हेही वाचा :

Pune Crime: मला नवा फोन हवाय; पैशांची जुळवाजुळव झाली नसल्यानं पती हतबल, महिलेनं उचललं टोकाचं पाऊल

दुप्पट रॅम, दुप्पट पिक्सेलचा कॅमेरा, आयफोन 16 नंतर आता आयफोन 17 ची चर्चा; दमदार फिचर्ससह लॉन्च कधी होणार?

मोठी बातमी! आयफोन 16 लॉन्च होताच आयफोन 15, आयफोन 14 झाले स्वस्त, तब्बल 'इतक्या' रुपयांनी घट!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah Bag Check : अमित शाहांनाही रोखलं,निवडणूक पथकाने तपासली एक-एक बॅग!CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Embed widget