Pune Crime: मला नवा फोन हवाय; पैशांची जुळवाजुळव झाली नसल्यानं पती हतबल, महिलेनं उचललं टोकाचं पाऊल
Pune Crime: मोबाईल फोन न मिळाल्यामुळे विवाहीत शिवानीनं टोकाचं पाऊस उचलत आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे.
Maharashtra Pune Crime News : पुणे : संपूर्ण महाराष्ट्र हादरवणारी घटना पुण्यात घडली आहे. पुण्यात एका विवाहीत महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. महिलेच्या आत्महत्येचं कारण ऐकल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. मृत महिलेचं नाव शिवानी गोपाळ शर्मा असून ती 20 वर्षांची असल्याचं समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोबाईल फोन न मिळाल्यामुळे विवाहीत शिवानीनं टोकाचं पाऊस उचलत आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. शिवानी आणि गोपाळचं नुकतंच लग्न झालं होतं. गेल्या अनेक वर्षांपासून गोपाळ पुण्यातील एका खासगी कंपनीत छोटीशी नोकरी करत होता. त्याची पत्नी शिवानी गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्याकडे नवा मोबाईल मागत होती. पण, गोपाळ त्याला मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारात संसाराचा कसाबसा गाडा हाकत होता. त्यानं तिला आपण नंतर घेऊ असं सांगितलं. पण, शिवानी हट्टालाच पेटली होती. गोपाळनं मोबाईल विकत घेण्याचा प्रयत्न केला, पण पैशांची जुळवाजुळव काही होईना. त्यानं शिवानीला समजावण्याचा प्रयत्न केला, पण शिवानी ऐकतच नव्हती. तिचा हट्ट काही केल्या थांबत नव्हता.
महिलेनं गळफास घेत आत्महत्या
ज्यावेळी शिवानीचा हट्ट पूर्ण झाला नाही, त्यावेळी तिनं टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. बुधवारी संध्याकाळी 7 वाजता राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. पती गोपाळ कामावरून घरी परतला, त्यावेळी त्याला पत्नी लटकलेल्या अवस्थेत दिसली.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला
यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलिसांनी मृत महिलेच्या पतीचा जबाबही नोंदवला. तपासानुसार, पुढील कारवाई केली जाईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :