Best Camera Smartphone : 25,000 च्या बजेटमध्ये येतात 'हे' बेस्ट कॅमेरा स्मार्टफोन्स, 'या' मॉडेलला मिळणार 200 मेगापिक्सलची लेन्स
तुमचं बजेट 20 ते 25 हजार रुपयांच्या दरम्यान असेल आणि तुम्हाला या रेंजमध्ये स्वत:साठी एक उत्तम कॅमेरा सेंट्रिक स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही बेस्ट ऑप्शन्स घेऊन आलो आहोत.
Best Camera Smartphone : सध्या सोशल मीडियावर फोटोंचा चांगलाच (Smartphone) ट्रेंड सुरु आहे. त्यामुळे प्रत्येकजण फोन घेताना चांगल्या कॅमेऱ्याचाच फोन घेण्याच्या तयारीत असतात मात्र अनेकांना फोनमध्ये भरपूर पैसे घालवायचे नसतात किंवा एवढा खर्च करायचा नसतो. त्यामुळे जर तुमचं बजेट 20 ते 25,000 रुपयांच्या दरम्यान असेल आणि तुम्हाला या रेंजमध्ये स्वत:साठी एक उत्तम कॅमेरा सेंट्रिक स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही बेस्ट ऑप्शन्स घेऊन आलो आहोत.
Infinix GT 10 Pro
इनफिनिक्स जीटी 10 प्रो : या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 108 मेगापिक्सलप्रायमरी कॅमेरासह ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. फ्रंटमध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 8050 प्रोसेसर आणि 5000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन तुम्ही 21,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
Samsung Galaxy F54 5G:
सॅमसंग गॅलेक्सी एफ54 5G : सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6000 एमएएच ची बॅटरी आणि 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो. ज्यांना जास्त बॅटरी असलेला मोबाईल हवा आहे त्यांच्यासाठी हा स्मार्टफोन चांगला आहे. फोनमध्ये 120 हर्ट्झरिफ्रेश रेटसह 6.7 इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. दिवाळी सेल अंतर्गत हा स्मार्टफोन 25,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत दिला जात होता. एक्सचेंज ऑफरचा फायदा घेतल्यास हा स्मार्टफोन तुम्ही 25,000 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करू शकता.
OnePlus Nord CE 3 Lite 5G :
OnePlus Nord CE 3 Lite 5G: तुम्हाला OnePlus फोन खरेदी करायचा असेल, तर OnePlus Nord C3 Lite 5G हा एक उत्तम फोन आहे. यामध्ये तुम्हाला 108MP प्रायमरी कॅमेरा, 5000 mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर मिळेल. 256GB व्हेरिएंटसाठी मोबाईल फोनची किंमत 21,076 रुपये आहे.
Realme 11 Pro Plus 5G :
रियलमी 11 प्रो प्लस 5जी स्मार्टफोनमध्ये कंपनी 200 मेगापिक्सलचा कॅमेरा देते. 8/256 जीबी व्हेरिएंटची किंमत 27,999 रुपये आहे. एक्सचेंज ऑफरचा फायदा घेत खरेदी केल्यास 25,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत हा मोबाईल फोन खरेदी करू शकता. फोनमध्ये 5000 एमएएच ची बॅटरी आणि मीडियाटेक डायमेंसिटी 7050 प्रोसेसर आहे.
याशिवाय पोको एक्स 5 प्रो 5 जी, रेडमी नोट 12 प्रो 5जी किंवा विवो टी 2 प्रो 5 जी देखील खरेदी करू शकता. वरील सर्व स्मार्टफोन तुम्ही कोणत्याही माध्यमातून ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी करू शकता.
इतर महत्वाची बातमी-