एक्स्प्लोर

Apple Security : iphone हरवला किंवा चोरीला गेला तर Don't Worry! iPhone मध्ये येणार नवं फीचर, आता फोन अधिक सुरक्षित राहणार!

आयफोन युजर्सच्या सुरक्षेला पुढच्या पातळीवर नेण्यासाठी अॅपल एका नव्या सिक्युरिटी फीचरवर काम करत आहे. ज्यामुळे तुमचा डेटा सुरक्षित राहू शकणार आहे.  जाणून घ्या काय आहे ते...

Apple Security :  अॅपलच्या आयफोनची किंमत इतकी जास्त आहे की, चुकून (Apple Security ) कधी चोरी झाली तर सामान्य माणसाची झोप उडेल. चोरी झाल्यास पैसे वाया जातात, तसेच डेटा लीक होण्याचा ही धोका असतो. जर चोराला चुकून तुमचा पासवर्ड माहित झाला तर तो तुमच्या आयफोनचा डेटा मिळवू शकतो. तसेच तुमच्या बँक अकाऊंटमधून वर्षानुवर्षांची कमाई, खासगी गोष्टींचा चुकीच्या पद्धतीने वापर होऊ शकतो. आयफोन युजर्सच्या सुरक्षेला पुढच्या पातळीवर नेण्यासाठी अॅपल एका नव्या सिक्युरिटी फीचरवर काम करत आहे. ज्यामुळे तुमचा डेटा सुरक्षित राहू शकणार आहे.  जाणून घ्या काय आहे ते...

'या' दमदार फीचरवर काम सुरू

वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, अॅपल आपल्या नव्या iOS 17.3  अपडेटमध्ये “Stolen Device Protection”  नावाचा मोड ऑफर करणार आहे. हे फीचर सुरू झाल्यानंतर जर तुमचा आयफोन तुमचे प्रायमरी लोकेशन नसलेल्या लोकेशनमध्ये राहत असेल तर हा मोड आपोआप ऑन होईल आणि आयफोनमधून सेन्सिटिव्ह डेटा अॅक्सेस करण्यासाठी पासकोडव्यतिरिक्त फेस आयडी बायोमेट्रिक देखील टाकावे लागेल. केवळ माहिती अॅक्सेस करण्यासाठीच नाही तर अॅपल आयडी बदलण्यासाठी आणि फोन रिसेट करण्यासाठी तुम्हाला या दोन स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्यांच्याशिवाय तुमच्या आयफोनमधून कोणीही काहीही काढू शकणार नाही. हे नवे फीचर अॅपल युजर्सच्या सुरक्षिततेसाठी काम करेल आणि त्यांना मोठ्या अडचणीपासून वाचवणार आहे. 

'Lost mode' खास सिक्युरिटी फीचर 

अॅपलने आयफोन युजर्सना 'Lost mode' नावाचे फीचर दिले आहे, ज्याच्या मदतीने युजर्स आपला हरवलेला आयफोन हरवलेला म्हणून शोधू करू शकतात. युझर्स iCloud द्वारे ते चालू करू शकतात ज्यानंतर ते डिसेबल होते आणि ओनर  त्याचे लोकेशन देखील शेअर करते. जे लोक iOS17.3 बीटा वापरत आहेत ते स्टोलन मोड वापरू शकतात. सेटिंग्सच्या आत पासकोडमध्ये तुम्हाला हा पर्याय मिळेल.   

 NameDrop मुळे डेटा लीक होण्याचा धोका

अॅपलने नुकतेच iOS 17 अपडेट सादर केले असून त्यात 'नेमड्रॉप' नावाचे नवे फिचर होते. आयफोन युजर्ससोबत स्ट्रीमिंग कॉन्टॅक्ट्स शेअर करणे हा त्याचा उद्देश होता. पेनसिल्व्हेनियाच्या सिटी ऑफ चेस्ट पोलिस विभागाने अलर्ट जारी केला आहे. यामध्ये एअरड्रॉपचा धोका सांगण्यात आला आहे.  NameDrop फीचरचा गैरवापर अनोळखी व्यक्तीही करू शकते, असा दावा पोलिसांनी केला आहे. कारण ठराविक मर्यादेत आल्यानंतर फोनची माहिती शेअर केली जाते. विशेषत: जेव्हा नेमड्रॉप एखाद्या अनोळखी व्यक्तीने अॅक्टिव्हेट केला असेल, तेव्हा आपली माहिती किंवा डेटा शेअर होण्याची दाट शक्यता आहे. 

इतर महत्वाची बातमी-

iPhone Spam Call : आयफोनवरील स्पॅम कॉलची भानगडच संपणार, सेटिंग्जमध्ये करा 'हे' छोटे बदल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा

व्हिडीओ

Chandrapur Mayor : चंद्रपुरात पक्षाअंतर्गत कुरघोडीला उधाण  Special Report
Solapur Praniti shinde Vs Jaykumar gore : निकालानंतरचे शोले टीका, टोमणे, टोले Special Report
Samadhan Sarvankar : सरवणकरांचं अ 'समाधान' भाजपवर शरसंधान Special Report
NCP on ZP Election : महापालिकेच्या पराभवानंतर पवारांनी कोणता धडा घेतला? Special Report
BJP on Samadhan Sarvankar : समाधान सरवणकर यांना जी मत मिळाली ती फक्त भाजपमुळे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
Embed widget