(Source: ECI/ABP News/ABP Majha)
iPhone 15 Series : बहुप्रतिक्षित आयफोन 15 सीरिज लाँच, भन्नाट फिचर्स आणि किंमत जाणून घ्या...
iPhone 15 Series Launch : ॲपलच्या वंडरलस्ट इव्हेंटमध्ये बहुप्रतिक्षित आयफोन 15 सीरिजसह इतरही अनेक डिव्हाईसेस लाँच करण्यात आले आहेत.
मुंबई : ॲपल (Apple) कंपनीची बहुप्रतिक्षित आयफोन 15 सीरिज लाँच (iPhone 15 Series) करण्यात आली आहे. ॲपलने वंडरलस्ट (Wonderlust) इव्हेंटमध्ये (Apple Event 2023) नवीन आयफोन 15 सीरिज लाँच केली आहे. आयफोन 15 मध्ये 48 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. आयफोन 15 पाच कलर व्हेरियंटमध्ये लाँच (iPhone 15 Series Launch) करण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयफोन 15 मध्ये सी-टाईप चार्जिंग पोर्ट देण्यात आलं आहे. आयफोन 15 सीरिजमध्ये टायटॅनियम मटेरिअलचा वापर करण्यात आला आहे.
बहुप्रतिक्षित आयफोन 15 सीरिज लाँच
आयफोन 15 प्लस (iPhone 15 Plus) 14 देशांमध्ये सेल्युलर सेवेशिवाय काम करू शकेल. यामध्ये यूएसबीसी पोर्ट असेल ज्याचा तुम्ही चार्जिंगसह डेटा, ऑडिओ आणि व्हिडीओ ट्रान्सफर करण्यासाठी वापर करु शकता. याच्या मदतीने तुम्ही Airpods आणि Watch देखील चार्ज करू शकता. ॲपल कंपनीने आयफोन 15 सीरिजमध्ये कॅमेरा लेन्समध्ये थोडा बदल केला आहे. आयफोन 15 सीरिजमध्ये 48-मेगापिक्सेल मेन कॅमेरा देण्यात आला आहे.
This is iPhone 15! Will you be getting one? #AppleEvent pic.twitter.com/btiOdKYafd
— Apple Hub (@theapplehub) September 12, 2023
iPhone 15 and iPhone 15 Plus : आयफोन 15 आणि आयफोन 15 प्लसची किंमत किती?
आयफोन 15 (iPhone 15) च्या 128 GB व्हेरिएंटची किंमत 799 डॉलर आहे. तर, आयफोन 15 प्लस (iPhone 15 Plus) च्या 128 GB व्हेरिएंटची किंमत 899 डॉलर आहे. थोडक्यात आयफोन 15 (iPhone 15) च्या 128 GB व्हेरियंटची किंमत 66,230 रुपयांपासून सुरू होईल आणि आयफोन 15 प्लस (iPhone 15 Plus) च्या 128 GB व्हेरियंटची किंमत सुमारे 74,500 रुपयांपासून सुरू होईल.
iPhone 15 and iPhone 15 Plus start at $799 and $899 #AppleEvent pic.twitter.com/iFFv35SPDv
— Apple Hub (@theapplehub) September 12, 2023
कॅमेरा आणि डिस्पेबाबत माहिती
आयफोन 15 सीरिजमध्ये 48 मेगापिक्सेल मेन कॅमेरा, 24 मेगा पिक्सेल सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर, 12 मेगापिक्सेल फ्रंटकॅमेरा देण्यात आला आहे. आयफोन 15 मध्ये 6.1 इंच स्क्रिन देण्यात आली आहे. त्याशिवास आयफोन 15 प्लसमध्ये 6.7 इंचाची डिस्पे देण्यात आला आहे.
आयफोन 15 सीरिजमध्ये A16 बायोनिक चिप फिचर्स फार महत्त्वाचं आहे.
The iPhone 15 features the A16 Bionic chip! #AppleEvent pic.twitter.com/M7iMhO4fLg
— Apple Hub (@theapplehub) September 12, 2023
भारतात आयफोन 15 कधीपासून उपलब्ध होणार?
ॲपलच्या आयफोन 15 सीरिजची प्री-ऑर्डर 15 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. भारतात आयफोन 15 सीरिज 22 सप्टेंबरपासून उपलब्ध होईल. मुंबई किंवा दिल्ली या शहरांमधील ॲपल स्टोरमध्ये जाऊन तुम्ही आयफोन 15 सीरिज खरेदी करु शकता. इतर शहरांमधील लोक आयफोन 15, आयफोन 15 प्लस, आयफोन 15 प्रो, आयफोन 15 प्रो मॅक्स हे फोन ॲपल कंपनीच्या ऑनलाईन साईटवरुन बूक करू शकतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :