Amazon Prime : अॅमेझॉन प्राईम युजर्सना धक्का! नव्या वर्षापासून भरावे लागणार एक्स्ट्रा पैसे!
जर तुम्ही अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ वापरत असाल तर तुम्हाला जोरदार धक्का बसू शकतो, कारण जानेवारी 2024 पासून अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर जाहिराती दाखवल्या जातील.
Amazon Prime : जर तुम्ही अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ वापरत (Amazon Prime ) असाल तर तुम्हाला जोरदार धक्का बसू शकतो, कारण जानेवारी 2024 पासून अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर जाहिराती दाखवल्या जातील. म्हणजेच नवीन वर्षापासून अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ स्ट्रीमिंग अॅप पाहताना तुम्हाला जाहिराती पाहाव्या लागतील. प्राइम व्हिडिओवर बाकी स्ट्रिमिंगपेक्षा कमी प्रमाणात जाहिराती दिसणार आहेत.
Ad Free Service नेमकं काय आहे?
जाहिराती पाहायच्या नसतील तर Ad Free Service घेणं आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला दर महिन्याला एक्स्ट्रा 250 रुपये मोजावे लागतील. नवीन वर्षापासून म्हणजेच जानेवारी 2024 पासून हे फी द्यावी लागू शकते. द वर्जच्या रिपोर्टनुसार, 29 जानेवारीपासून अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आणि कॅनडामध्ये अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर जाहिराती दाखवण्यास सुरुवात होईल. त्यानंतर फ्रान्स, इटली, स्पेन, मेक्सिको आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये ही अॅप सेवा लागू करण्यात येणार आहे. मात्र, ही Ad Free Service भारतात सुरू होणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
काय आहेत फायदे?
अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ भारतात खूप लोकप्रिय आहे. प्राइम व्हिडिओ 4के रिझोल्यूशनमध्ये चित्रपट आणि टीव्ही शो ऑफर करते. ही सेवा स्मार्टफोन, टॅब्लेट, लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्हीवर उपलब्ध आहे. अॅमेझॉन प्राईम सब्सक्रिप्शनएकाच वेळी चार डिव्हाइसवर प्राइम व्हिडिओ पाहू शकणार आहे.
अॅमेझॉन प्राईम व्हिडिओची किंमत 1,499 रुपये आहे. या सब्सक्रिप्शनमध्ये फ्री डिलिव्हरीसह प्राइम म्युझिक, प्राइम गेमिंग आणि प्राइम रीडिंग मिळते. ही सेवा अमेरिकेत उपलब्ध आहे. अॅमेझॉन प्राईम लाइट भारतात अॅमेझॉनने उपलब्ध करून दिले आहे. याची महिन्याला किंमत 799 रुपये आहे. व्हिडिओ प्राईम मोबाइल सब्सक्रिप्शनची किंमत 599 रुपये आहे, ज्यामुळे प्राइम व्हिडिओ अॅपद्वारे स्मार्टफोन किंवा टॅब्लेटवर सर्व अॅक्सेस मिळतो.
मेझॉन प्राईम लाइट सब्सक्रिप्शन आता स्वस्त्यात
ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनने भारतात आपल्या ॲमेझॉन प्राइम लाइट सब्सक्रिप्शनची फी कमी केली आहे. कंपनीने वार्षिक फी 200 रुपयांनी कमी केली आहे. आतापर्यंत कंपनी वार्षिक सब्सक्रिप्शनसाठी 999 रुपये लागत होती पण, आता ग्राहकांना हा प्लॅन फक्त 799 रुपयांत मिळणार आहे. कंपनीने किंमती कमी केल्याच पण ॲमेझॉनने या प्लॅनअंतर्गत मिळणाऱ्या बेनिफिट्समध्ये बदल केला आहे.ॲमेझॉन प्राईम लाइट सब्सक्रिप्शन अंतर्गत कंपनी आता वन डे डिलिव्हरी, टू डे, शेड्यूल डिलिव्हरी आणि सेम डे डिलिव्हरीचा पर्याय देत आहे. तसेच नो कॉस्ट ईएमआय, 6 महिन्यांसाठी फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट, ॲमेझॉन डील्स आणि व्हिडीओंचा लवकर ॲक्सेस देखील कंपनीकडून दिला जाणार आहे. याशिवाय नवीन प्लॅनअंतर्गत कंपनी 175 रुपयांपेक्षा जास्त ऑर्डरवर मॉर्निंग डिलिव्हरी, रश-शिपिंग आणि 25 रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील देणार आहे. कंपनीने आणखी एक बदल केला आहे म्हणजे आधी ॲमेझॉन प्राइम लाइट सब्सक्रिप्शन 2 डिव्हाइस चालवत होते, पण आता या प्लॅनमध्ये फक्त एकच डिव्हाइस चालेल.
इतर महत्वाची बातमी-