AC Temperature : उन्हाळ्यात एसीचं तापमान नेमकं किती ठेवावं, शरीरासाठी योग्य काय? जाणून घ्या विजेची बचत कशी करावी?
AC Temperature : आपल्यापैकी अनेकांना ही सवय असते की उन्हातून, बाहेरून घरी आल्यानंतर सर्वात आधी एसी सुरु करताच तो 18 किंवा 21 अंशांवर ठेवतात. पण, योग्य तापमान किती हे अनेकांना माहीत नसतं.
AC Temperature : हिवाळा (Winter) संपून कडक उन्हाळ्याला (Summer Season) सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रासह देशभरात कडक उन्हाने लोकांचं टेम्प्रेचर (Temperature) अगदी गरम केलंय. अशातच घरोघरी, दुकानांत, ऑफिसमध्ये आजकाल लोकांनी एसी (AC) वापरायला सुरुवात केली आहे. आजकाल तर मोठ्या शहरांपासून ते अगदी छोट्या शहरांपर्यंत एसीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, अनेक वर्षांपासून एसी चालवणाऱ्या लोकांनाही वीजेची बचत करण्यासाठी आणि आरामदायी अनुभव घेण्यासाठी एसीचं टेम्प्रेचर नेमकं किती ठेवावं हे माहीत नसतं. याचसाठी आम्ही तुम्हाला एसीचं तापमान कोणत्या तापमानावर ठेवणं योग्य आहे हे सांगणार आहोत.
खरंतर, आपल्यापैकी अनेकांना ही सवय असते की उन्हातून, बाहेरून घरी आल्यानंतर सर्वात आधी एसी सुरु करताच तो 18 किंवा 21 अंशांवर ठेवतात. अर्थात, यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता निघून वातावरण थंड राहते. पण, ही सवय तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. खासकरून तुम्हाला विजेची बचत करायची असते तेव्हा तर ही सवय वाईटच आहे. कारण, एसी चालवल्याने वीज बिल जास्त येतं हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. अशा वेळी प्रश्न पडतो तो म्हणजे एसीचं योग्य तापमान किती असावं?
शरीरासाठी योग्य तापमान काय?
भारत सरकारने 2020 पासून AC साठी 24 अंशांवर टेम्प्रेचर ठेवण्याची डीफॉल्ट सेटिंग केली आहे. तज्ज्ञांचंही असं म्हणणं आहे की निरोगी शरारीसाठी इतकं तापमान योग्य आहे. पण, अनेक अभ्यासातून असं समोर आलं आहे की, प्रत्येक एका अंशामागे 6 टक्के विजेची बचत होते. एसी जेवढा कमी तापमानात चालता तेवढा कॉम्प्रेसर जास्त काम करतो परिणामी विजेचं बिल जास्त येतं. याचाच अर्थ जास्त तापमानात एसी चालवल्यास प्रत्येक प्रमाणात विजेची बचत करता येते.
तज्ज्ञांचं म्हणणं काय?
मानवी शरीराचं तापमान 36 ते 37 अंशापर्यंत असते. त्यामुळे 24 अंशावरील एसी आरोग्यासाठी उत्तम असतो असं तज्ज्ञांचं मत आहे. याचाच अर्थ यापेक्षा कमी तापमान आपल्या शरीरासाठी धोकायदायक ठरू शकते. यासाठीच तुमच्या घरातील एसीचं तापमान 22 ते 26 डिग्री सेल्सिअसपर्यंत ठेवणं तुमच्यासाठी योग्य ठरेल. आपल्यासाठी नैसर्गिकरित्या थंड आहे आणि आपल्या शरीराला आराम देण्यासाठी 24 ते 26 अंश पुरेसे आहे. अशा स्थितीत मानवी शरीरासाठी 24 अंश पुरेसे असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. तुम्हीदेखील ही चूक करत असाल तर वेळीच ही सवय बदला.
महत्त्वाच्या बातम्या :