Aadhaar Card Update: आधार कार्डला झाले 10 वर्षे? विनामूल्य करा आधार कार्ड अपडेट, केवळ काही दिवसांसाठीच संधी
Aadhaar Card Update: आधार अपडेट 14 जून पर्यंत विनामूल्य असणार आहे. त्यानंतर मात्र आधार अपडेट करण्यासठी शुल्क आकारले जाणार आहे.
![Aadhaar Card Update: आधार कार्डला झाले 10 वर्षे? विनामूल्य करा आधार कार्ड अपडेट, केवळ काही दिवसांसाठीच संधी Aadhaar card update online know how Aadhaar card update are done online name verification of mobile numbers email IDs in Marathi Aadhaar Card Update: आधार कार्डला झाले 10 वर्षे? विनामूल्य करा आधार कार्ड अपडेट, केवळ काही दिवसांसाठीच संधी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/09/972dde65a6357438d4d433bc25f770d71675955144171561_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aadhaar Card Update: आधार कार्ड (Aadhaar Card) हे अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र म्हणून वापरलं जातं. आधार कार्ड (Aadhaar Card) 12 अंकी युनिक आयडी नंबर आहे. आधार कार्ड बँक अकाऊंटपासून ते शाळा-कॉलेजमधील प्रवेश सर्वच ठिकाणी फार आवश्यक आहे. जर तुम्ही आधार कार्ड दहा वर्षापूर्वी काढले असेल आणि दहा वर्षात एकदाही अपडेट केले नसेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमचे आधार कार्ड अपडेट करण्याची गरज आहे. आधार अपडेट 14 जून पर्यंत विनामूल्य असणार आहे. त्यानंतर मात्र आधार अपडेट करण्यासठी शुल्क आकारले जाणार आहे. तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. घर बसल्या देखील तुम्हाला आधार कार्ड अपडेट करता येणार आहे.
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला दोन कागपत्रांची आवश्यकता आहे. पहिले ओळखपत्र आणि दुसरे म्हणजे अॅड्रेस प्रूफ. आधार केंद्रावर आधार अपडेट करण्यसाठी 50 रुपये शुल्क आकारले जाते परंतु UIDAI ने दिलेल्या महितीनुसार ही सेवा 14 जूनपर्यंत विनामूल्य आहे.
आधारकार्ड कसे अपडेट करावे?
- मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये UIDAI च्या वेबसाईटवर जा
- आधार नंबर टाकून ओटीपीच्या माध्यमातून लॉगिन हा पर्याय निवडा
- त्यानंतर कागदपत्रे अपडेटवर क्लिक करून व्हेरीफाय करा
- त्यानंतर आपले ओळखपत्र आणि अॅड्रेस प्रूफची स्कॅन कॉपी अपलोड करा
- त्यानंतर अपडेटवर क्लिक कर.
- त्यानंतर तुम्हाला एक रिक्वेस्ट नंबर मिळेल आणि हा नंबर आला म्हणजे तुमचा अर्ज स्विकारला गेला आहे
- रिक्वेस्ट नंबरचा वापर करून तुम्हाला स्टेटस चेक करता येणार आहे
30 एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करा
नव्याने अनुदानावर (Grant) येणाऱ्या शाळा (School) आणि महाविद्यालयांना (College) वेतन अनुदानासाठी संच मान्यता आवश्यक आहे. त्यासाठी 30 एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट (Aadhaar Card Update) करणे आवश्यक असून, त्यानुसारच या विद्यार्थ्यांना (Students) अनुदान दिले जाणार आहे.
घरबसल्या ऑनलाइन करा 'हे' अपडेट्स
आधार कार्डमध्ये अनेक गोष्टी ऑनलाइन अपडेट केल्या जाऊ शकतात. यामध्ये नाव, जन्मतारीख, पत्ता आणि लिंग इत्यादी माहिती तुम्हाला घरबसल्या मोबाईल किंवा संगणकावर ऑनलाइन बदलता येते. त्याचबरोबर UDI ची विशेष सुविधाही आहे, ज्यामध्ये तुम्हाला आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर बदलायचा असेल तर तुम्ही भारतीय पोस्टल वेबसाइटवरून मोबाईल नंबर बदलू शकता.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)