एक्स्प्लोर
गंभीरनंतर युवराजचीही टीम इंडियात एंट्री?

मुंबई: न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात गौतम गंभीरनं पुनरागमन केलं आहे. आता गंभीरसोबतच युवराज सिंहसाठीही देखील एक चांगली बातमी आहे. तब्बल दोन वर्षानंतर फलंदाज गौतम गंभीरला टीम इंडियामध्ये स्थान देण्यात आलं आहे. त्याबरोबर युवराज सिंह देखील वनडे संघात पुनरागमन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बंगळुरुच्या नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) करण्यात आलेल्या फिटनेस टेस्टमध्ये दोन्ही खेळाडू उत्तीर्ण ठरले आहेत. येत्या काही काळात टीम इंडिया भारतात अनेक मालिका खेळणार आहे. त्यामुळे बीसीसीआय संघाचा बॅकअप तयार करीत आहे. टीम इंडिया सध्या न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत असून यानंतर 5 वनडे सामन्यांचीही मालिका होणार आहे. युवराज शेवटचा सामना द. आफ्रिकाविरुद्ध 2013 साली खेळला होता. त्यामुळे वनडे संघात युवराजला संधी मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. संबंधित बातम्या: गौतम गंभीरचं टीम इंडियात पुनरागमन, जयंत यादवलाही संधी तब्बल दोन वर्षांनी पुनरागमनानंतर गंभीर म्हणतो..
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























