Vinesh Phogat On Yogeshwar Dutt: '...आणि ते हसणं डोक्यात गेलं', योगेश्वर दत्त यांच्यावर विनेश फोगाटची संतप्त प्रतिक्रिया
Vinesh Phogat On Yogeshwar Dutt:कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांच्यावर विनेश फोगाटने ट्विट करत आरोप केले असून योगेश्वर यांनी कुस्तीपटूंना आशियाई खेळासाठी देण्यात आलेल्या सवलतींवर सवाल उपस्थित केले आहेत.
Vinesh Phogat On Yogeshwar Dutt: ऑलम्पिक पदविजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या सहा कुस्तापटूंना (Wrestlers) आशियाई खेळात देण्यात येणाऱ्या सवलतींवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या या भूमिकेवर महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. विनेश फोगाटने (Vinesh Phogat) शुक्रवारी (23 जून) रोजी म्हटलं की, 'योगेश्वर दत्तचं ते घाणरेडं हसणं डोक्यात बसलं आहे.' योगेश्वर दत्त हे महिला कुस्तीपटूंसाठी बनवण्यात आलेल्या दोन समित्यांचा ते भाग होते.
विनेश फोगाटने ट्विट करत योगेश्वर दत्त यांच्यावर आरोप केले आहेत. ट्विट करत विनेश फोगाटने म्हटलं आहे की, 'जेव्हा महिला कुस्तीपटू समितीसमोर आपले म्हणणे मांडत होत्या तेव्हा योगेश्वर दत्त खूप घाणेरड्या पद्धतीने हसत होते. जेव्हा दोन महिला कुस्तीपटू पाणी पिण्यासाठी बाहेर आल्या तेव्हा योगेश्वर दत्त यांनी त्यांना म्हटलं की, बृजभूषण यांचं काही होणार नाही, तुम्ही जाऊन तुमचा सराव करा. तर त्यांनी दुसऱ्या महिला कुस्तीपटूला म्हटलं की, हे सगळं होतचं राहतं त्यामुळे या गोष्टीला इतका मोठा मुद्दा बनवू नका.'
योगेश्वर दत्त का वीडियो सुना तो उसकी वह घटिया हंसी दिमाग़ में अटक गई. वह महिला पहलवानों के लिए बनी दोनों कमेटियों का हिस्सा था. जब कमेटी के सामने महिला पहलवान अपनी आपबीती बता रही थीं तो वह बहुत घटिया तरह से हंसने लगता. जब 2 महिला पहलवान पानी पीने के लिए बाहर आयीं तो बाहर आकर उनको…
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) June 23, 2023
'म्हणून दोनदा निवडणूक हारले'
विनेश फोगाटने पुढे लिहीतांना म्हटलं की, 'ते सतत कुस्तीपटू आणि प्रशिक्षकांना महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनात सहभागी होण्यापासून अडवत होते. त्यामुळे सर्वांना समजलं होतं की योगेश्वर हे बृजभूषण सिंह यांची पाठराखण करत आहेत. समाजात केलेल्या गद्दारीमुळे ते दोन वेळा निवडणुकांमध्ये देखील पराभूत झाले आहेत.'
'कुस्तीपटूंना मोडून काढण्याचा अजिबात प्रयत्न करु नका त्यांचा हेतू खूप स्पष्ट आहे. त्यामुळे तुमचीच कंबर अशाने मोडेल,' असं म्हणत विनेश फोगाटने योगेश्वर दत्त यांना थेट इशारा दिला आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन समितीने येणाऱ्या आशियाई स्पर्धांसाठी आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी सहा कुस्तीपटूंना निवड प्रक्रियेमध्ये फक्त एकच सामना खेळावा लागणार आहे. आशियाई स्पर्धांसाठी आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी या कुस्तीपटूंना फक्त चाचणी सामना जिंकणे गरजेचे असेल. फक्त सहा कुस्तीपटूंना ही सवलत देण्यात आली आहे. त्यामध्ये विनेश फोगाट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, संगीता फोगाट, सत्यव्रत फोगाट आणि जितेंद्र किन्हा या कुस्तीपटूंचा समावेश आहे.
यावर योगेश्वर दत्त यांची प्रतिक्रिया काय?
या कुस्तीपटूंना देण्यात आलेल्या या सवलतीवर योगेश्वर दत्त यांनी सवाल उपस्थित केले आहेत. तसेच त्यांनी म्हटलं आहे की, टया कुस्तीपटूंचा हाच हेतू होता का? भारतीय कुस्तीसाठी हा एक काळा दिवस आहे. त्यांनी आपल्या ट्विटवरुन एक व्हिडिओ शेअर करत त्यामध्ये म्हटलं आहे की, 'विनेश फोगाट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, संगीता फोगाट, सत्यव्रत फोगाट आणि जितेंद्र किन्हा यांनी ही सवलत का देण्यात आली आहे, कारण अनेक चांगले कुस्तीपटू सध्या आहेत. त्यामुळे यांना अशी सवलत देणे हे चुकीचे आहे.'
क्या धरना देने वाले खिलाड़ियों का यही मकसद था? कुश्ती के लिए यह काला दिन!! #wrestling pic.twitter.com/OacaEJmpz5
— Yogeshwar Dutt (@DuttYogi) June 23, 2023