T20 Women WC Live Score : भारताचा विडिंजवर सहा विकेट्सने विजय
India vs West Indies, Women T20 WC 2023 : आयसीसी महिला टी20 वर्ल्ड कप 2023 मध्ये आज भारतीय महिलांचा सामना वेस्ट इंडिजच्या महिला संघासोबत होणार आहे.
LIVE
Background
India vs West Indies, Women T20 WC 2023 : आयसीसी महिला टी20 वर्ल्ड कप 2023 मध्ये आज भारतीय महिलांचा सामना वेस्ट इंडिजच्या महिला संघासोबत होणार आहे. भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव करत विश्वचषकाची सुरुवात दणक्यात केली. पण आता टीम इंडियापुढे वेस्ट इंडिजचं तगडे आव्हान असेल. दक्षिण आऐफ्रिकामधील केपटाऊनच्या न्यूलँड्सच्या मैदानावर सामना होणार आहे.
टी 20 विश्वचषकात भारताने विजयाने सुरुवात केली पण वेस्ट इंडिज संघाला मात्र पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. विडिंजचा संघ इंग्लंड संघाकडून सात विकेट्सनं पराभव झाला होता. विश्वचषकातील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी वेस्ट इंडिजच्या संघाला भारताविरोधात विजय अनिवार्य आहे. आजच्या सामन्यात पराभव झाल्यास विडिंजचं उपांत्य फेरीतील आव्हान आणखी कठीण होणार आहे.
भारतीय संघानं विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या काही षटकात धावा दिल्या. भारतीय संघाला विजयासाठी गोलंदाजीत आणखी चांगली कामगिरी करावी लागणार आहे. गोलंदाजी सुधारली नाही तर भारताच्या अडचणी वाढू शकतात. फलंदाजीत जेमिमा रोड्रिग्स आणि ऋचा घोष यांनी दमदार फलंदाजी केली आहे. त्यामुळे मध्यक्रम मजबूत दिसत आहे. त्याशिीवाय या सामन्यात सलामी फलंदाज स्मृती मंधाना परतण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे विंडीज महिला टीमकडून पहिल्या सामन्यात कर्णधार हेली मॅथ्यूज आणि कॅम्पबेल यांनी मोठी खेळी केली होती. पण इतर फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. गोलंदाजीही सरासरी राहिली होती. वेस्ट इंडिजला विजयासाठी आपली कामगिरी सुधारण्याची गरज आहे.
कशी असेल भारतीय संघाची प्लेईंग 11
शेफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमिमा रोड्रिग्स, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कप्तान), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकर, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड आणि रेनुका सिंह
वेस्ट इंडीजचा संघ कसा असेल य़
हेली मॅथ्यूज (कप्तान), स्टेफनी टेलर, शेमाइनी कॅम्पबेल, शाबिका गजनबी, चिन्नेले हेनरी, चेडेन नेशन, एफी फ्लेचर, जाईदा जेम्स, शामीलिया कोन्नेल, रशादा विलियम्स (विकेटकीपर), शाकेरा सेल्मन.
भारताचा विडिंजवर सहा विकेट्सने विजय
कर्णधार हरमनप्रीत आणि ऋचा घोष यांच्या खेळीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजचा सहा विकेट्सने पराभव केला.
भारताला विजयासाठी 28 धावांची गरज
भारताला विजयासाठी 36 चेंडूत 27 धावांची गरज आहे. कर्णधार हरमनप्रीत आणि ऋचा मैदानावर आहेत.
ऋचा-हरमनप्रीतनं डाव सावरला
लागोपाठ तीन विकेट पडल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत आणि ऋचा घोष यांनी भारताचा डाव सावरला. ऋचा 10 तर हरमनप्रीत 15 धावांवर खेळत आहे. भारताला विजयासाठी 59 चेंडूत 52 धावांची गरज आहे.
शेफाली वर्मा 28 धावांवर बाद
शेफाली वर्माच्या रुपाने भारताला तिसरा धक्का बसला आहे. शेफाली वर्मा 28 धावांवर बाद झाली आहे. हरमनप्रीत कौर आणि ऋचा घोष सध्या मैदानावर आहेत.
भारताची फलंदाजी ढासळली, शेफाली वर्माही बाद
चांगल्या सुरुवातीनंतर भारताची फलंदाजी ढासळली आहे. आघाडी फळी तंबूत परतली आहे.