(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs ENG, Live Streaming : फायनल गाठण्याआधी टीम इंडियासमोर इंग्लंडचं आव्हान; कधी, कुठं पाहणार सामना?
IND vs ENG : टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ आज पुन्हा एकदा मैदानात उतरणार असून आज करो या मरो च्या सामन्यात भारतासमोर इंग्लंडचं आव्हान असणार आहे.
IND vs ENG Match Live Streaming : भारतीय संघ आज पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) सामना विश्वचषकातील दुसरा सेमीफायनलचा सामना असणार असून जिंकणारा संघ पाकिस्तानशी फायनलमध्ये दोन हात करेल. भारतीय संघाने सुपर 12 फेरीतील 5 पैकी 4 सामने जिंकत सेमीफायनल गाठली आहे. तर इंग्लंड संघाने 5 पैकी 3 सामने जिंकले असून त्यांचा एक सामना अनिर्णीत सुटला होता. ज्यामुळे दोन्ही संघ कमाल फॉर्मात असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आजचा हा 'करो या मरो' चा सामना दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, तर या महत्त्वाच्या सामन्याबद्दलची माहिती जाणून घेऊ...
कधी आहे सामना?
भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना आज अर्थात 10 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सामना सुरु होईल. सामना सुरु होण्यापूर्वी अर्धातास नाणेफेक होणार आहे.
कुठे आहे सामना?
हा सामना ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड येथील अॅडलेड ओव्हल क्रिकेट स्टेडियम (Adelaide Cricket Stadium) येथे खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील. तसंच डीडी स्पोर्ट्सवरही सामन्याचं थेट प्रक्षेपण होईल.
भारत विरुद्ध इंग्लंड Head to Head
टी20 क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड संघ यांच्यात आतापर्यंत 22 टी-20 सामने खेळवले गेले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता भारताचं पारडं काहीसं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. भारताने 22 पैकी 12 सामन्यात विजय मिळवलाय. तर, इंग्लंड संघाला 10 सामने जिंकता आले आहेत.
कसे असू शकतात दोन्ही संघ?
भारत: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.
इंग्लंड: अॅलेक्स हेल्स, जोस बटलर, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, फिल सॉल्ट, सॅम कुरन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड/डेव्हिड विली.
हे देखील वाचा-