(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shoaib Akhtar : 'आम्हीतर मेलबर्नला पोहोचलोय, आता तुमची वाट बघतोय', अख्तरचं VIDEO शेअर करत टीम इंडियाला चॅलेंज
T20 World Cup 2022 : विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडला मात देत पाकिस्तान फायनलमध्ये पोहोचली आहे. आता भारताचा सामना इंग्लंडशी सेमीफायनलमध्ये होणारा आहे.
Shoaib Akhtar : टी20 विश्वचषक 2022 स्पर्धा (T20 World Cup 2022) आता अगदी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडला मात देत फायनलचं तिकिट मिळवलं आहे. तर आता इंग्लंड आणि भारत यांच्यात सामना जिंकणारा संघ फायनल गाठेल. दरम्यान या सामन्यापूर्वीच पाकिस्तानच्या फायनलमध्ये पोहोचण्याचा आनंद आणि भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठीची उत्सुकता दाखवत पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरनं (Shoaib Akhtar) एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो पाकिस्तान फायनलमध्ये पोहोचली आहे आणि आम्ही भारताची वाट पाहतोय असं म्हटलं आहे.
तसंच व्हिडीओमध्ये पुढे अख्तर म्हणाला, आम्ही याआधी 1992 रोजीही मेलबर्नच्या मैदानावरच विश्वचषक जिंकलो होतो त्यावेळी इंग्लंडला मात दिली होती. आताही 2022 असून आकडे तसेच आहेत. त्यामुळे आम्ही आता इंग्लंडला मात देण्यासाठी सज्ज झालो आहोत. मी स्वत: य़ा महामुकाबल्यासाठी उत्सुक आहोत. मला आशा आहे, आता भारत उद्या इंग्लंडला मात देऊन फायनलमध्ये पोहोचला पाहिजे.
पाहा VIDEO -
Dear India, good luck for tomorrow. We'll be waiting for you in Melbourne for a great game of cricket. pic.twitter.com/SdBLVYD6vm
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) November 9, 2022
दुसरी सेमीफायनल भारत विरुद्ध इंग्लंड
आता पाकिस्तान संघाने फायनलमध्ये धडक घेतली आहे. आता उद्या म्हणजेच 10 नोव्हेंबर रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा सेमीफायनल सामना रंगणार असून त्यांच्यात जिंकणारा संघ पाकिस्तानविरुद्ध 13 नोव्हेंबरला फायनलचा सामना मेलबर्नच्या मैदानावर खेळणार आहे.
पाकिस्ताननं सामना जिंकत रचला विक्रम
टी-20 विश्वचषकातील पहिल्या सेमीफानयमध्ये न्यूझीलंड पराभव करून अंतिम फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये दोन्ही संघ आतापर्यंत 29 वेळा एकमेकांशी भिडले आहेत. यातील 18 सामन्यात पाकिस्तानच्या संघानं विजय नोंदवला आहे. तर, न्यूझीलंडच्या संघानं 11 सामने जिंकले आहेत. यातील आठ सामने न्यूझीलंडच्या संघानं त्यांच्या मायदेशात जिंकले आहेत. तर, पाकिस्तानच्या संघानं घरच्या मैदानावर सात आणि उर्वरित 11 सामने न्यूट्रल ठिकाणावर जिंकले आहेत. पाकिस्तानच्या संघानं टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा एका संघाविरुद्ध संघाला पराभूत करण्याचा विक्रम केलाय. पाकिस्तानपूर्वी हा विक्रम भारताच्या नावावर होता, भारतानं 17 वेळा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचा पराभव केलाय.
हे देखील वाचा-