एक्स्प्लोर

Virat Kohli : लाईव्ह परफॉर्मन्सवेळी अरिजित सिंह ओरडला, 'I Love You, Virat'; मग कोहलीनं केलं असं काही; 'हा' VIDEO एकदा पाहाच

World Cup 2023 : विश्वचषकात नरेंद्र मोदी स्टेडिअमवर लाईव्ह परफॉर्मन्सवेळी गायक अरिजित सिंह 'I Love You, Virat' ओरडला, यानंतर कोहलीनं दिलेली प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Virat Kohli : विश्वचषकाच्या (World Cup 2023) संगीत कार्यक्रमात लाईव्ह परफॉर्मन्सवेळी गायक अरिजित सिंह (Arijit Singh) ''आय लव्ह यू, विराट'' (I Love You, Virat) म्हणत ओरडला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडिया (Social Media) वर व्हायरल होत आहे. इतकंच नाही तर अरिजितने आय लव्ह यू म्हटल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) ची प्रतिक्रियाही सध्या जोरदार चर्चेत आहे. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये परफॉर्मन्सदरम्यान 'आय लव्ह यू विराट' असं ओरडणाऱ्या अरिजित सिंहला कोहलीनं सुंदर प्रतिक्रिया दिली.

लाईव्ह परफॉर्मन्सवेळी अरिजित सिंह ओरडला, 'I Love You, Virat'

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याआधी संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या संगीत कार्यक्रमात दिग्गजांनी हजेरी लावली. गायिका सुनिधी चौहान, नेहा कक्कड यांच्यासह अनेक सेलिब्रिटींसह अरिजित सिंह या कलाकारांनी विश्वचषक 2023 च्या भारत विरुद्ध पाकिस्तान या हाय-प्रोफाइल सामन्यापूर्वी नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये दमदार परफॉर्मन्स दिला. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी अरिजित सिंग, नेहा कक्कड, सुनिधी चौहान, शंकर महादेवन, श्रद्धा कपूर आणि सुनिधी चौहान यांनी एका शानदार संगीत कार्यक्रमात सादर केले. यातील अरिजित सिंहचा परफॉर्मन्स खास कारणामुळे चर्चेत आहे.

कोहलीची प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेत

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी संगीत कार्यक्रम सुरु असताना विराट कोहली इतर खेळाडूंसह सरावात व्यस्त होता. विराट खेळासाठी वॉर्म अप करत होता. यावेळी अरिजित आणि इतर कलाकारांचा परफॉर्मन्स सुरु होता. अरिजितने परफॉर्मन्सदरम्यान 'आय लव्ह यू विराट' अशी हाक दिली. यानंतर विराट कोहली स्मित हास्य दिलं. अरिजित सिंह आणि विराट कोहलीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ :

टीम इंडियाकडून पाकिस्तानचा 7 विकेटने पराभव

विराट कोहलीला या सामन्यात फारशी चांगली खेळी करता आली नाही कारण तो अवघ्या 16 धावांवर बाद झाला. दरम्यान, रोहित शर्माने या सामन्यात धडाकेबाज सुरुवात करून पाकिस्तान विरुद्ध सामना जिंकवून दिला. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत पाकिस्तानला केवळ 191 पर्यंत रोखलं. यामुळे भारतासमोर 192 धावांचं लक्ष्य होतं. बाबर आझम 50 धावा आणि मोहम्मद रिझवान 49 धावा करत 82 धावांची भागीदारी केली. पण इतर खेळाडूंना चांगली कामगिरी करता आली नाही. सलामीवीर शुभमन गिलचा डाल थोडक्यात आटोपल्यावर कर्णधार रोहित शर्माने 86 धावांची तुफान खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. भारताने पाकिस्तानचा सात विकेटने पराभव केला.

महत्वाच्या इतर बातम्या : 

IND vs PAK : 'किंग' कोहलीकडून बाबर आझमला जर्सी भेट, मैदानावरचा खास क्षण; वसीम अक्रम मात्र भडकला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP MajhaSpecial Report Ramtek Constituency : रामटेक मतदारसंघात ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
Embed widget