T20 World Cup 2022 : श्रीलंकेसह नेदरलँड सुपर 12 मध्ये दाखल, भारताच्या गटात नेदरलँडचा संघ
T20 World Cup 2022 Match : आज टी20 विश्वचषक स्पर्धेत ग्रुप ए मधून सुपर 12 मध्ये एन्ट्रीसाठी सामने रंगले असून या सामन्यांच्या निकालानंतर नेदरलँड आणि श्रीलंका हे संघ सुपर 12 मध्ये दाखल झाले आहेत.
T20 World Cup 2022 Super 12 : ऑस्ट्रेलियात 16 संघामध्ये सुरु झालेल्या टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup 2022) स्पर्धेतून आज दोन संघ बाद झाले आहेत. ग्रुप ए मधून सुपर 12 साठी श्रीलंका आणि नेदरलँडने एन्ट्री मिळवल्याने युएई आणि नामिबियाचा संघ आपोआपच स्पर्धेबाहेर झाल आहे. सुपर 12 मध्ये एन्ट्री मिळवण्यासाठी ग्रुप ए मधील आज पार पडलेल्या क्वॉलीफायर सामन्यात श्रीलंकेने नेदरलँडचा पराभव करत सुपर 12 फेरी गाठली पण नेदरलँडने आधीच 2 सामने जिंकल्याने ते देखील सुपर 12 मध्ये गेले आहेत. कारण युएई आणि नामिबिया संघ केवळ एक-एक सामनाच जिंकू शकले. आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्यात युएईने नामिबियाला 7 धावांनी मात दिली.
आज झालेल्या पहिल्या सामन्यात श्रीलंका संघाने नेदरलँडवर (SL vs NED) 16 धावांनी विजय मिळवला. यावेळी श्रीलंकेचा फलंदाज कुसल मेंडीसची 79 धावांची स्फोटक खेळी आणि नंतर गोलंदाजांची भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने नेदरलँड संघावर विजय मिळवला आहे. सामन्यात आधी फलंदाजी करत श्रीलंकेनं 162 धावा केल्या, ज्यांचा पाठलाग करताना नेदरलँडचा संघ 20 ओव्हरमध्ये 146 धावाच करु शकला आणि सामना श्रीलंकेनं 16 धावांनी जिंकला. श्रीलंका संघाने या विजयासह स्पर्धेत दोन विजय मिळवले त्यात नेदरलँडपेक्षा त्यांचा नेट रनरेटही चांगला असल्याने त्यांनी आधी सुपर 12 फेरी गाठली.
स्पर्धेत नेदरलँडनेही दोन सामने जिंकले होते, पण दिवसातील दुसऱ्या सामन्यात नामबियाने युएईला मात दिली असती तर नेदरलँड आणि नामिबिया दोघांचे दोन-दोन विजय झाले असते आणि मग नेटरनरेटच्या जोरावर पुढील फेरीत कोण जाणार? हे ठरवण्यात आलं असतं. पण नामिबियाचा संघ दुसऱ्या सामन्यात युएईकडून 7 धावांनी पराभूत झाला. सामन्यात आधी फलंदाजी करत युएईने 148 धावा केल्या, ज्याचा पाठलाग करताना नामिबियाचा संघ 20 ओव्हरमध्ये 141 रन करु शकला आणि 7 धावांनी त्यांचा पराभव झाला.
ग्रुप B मधून कोण जाणार सुपर 12 मध्ये?
सुपर 12 मध्ये आधी असणारे 8 संघ आणि आता ग्रुप A मधून गेलेल्या दोन संघानंतर आणखी केवळ 2 संघाची जाग मोकळी आहे. ग्रुप B मधून दोन संघ या ठिकाणी जाणार असून स्कॉटलंड, आयर्लंड, वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे या चौघांतील दोन संघ पुढे जाणार आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत या चौघांनी एक-एक सामना जिंकला असून आता उद्या अर्थात 21 ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यांतून विजेते संघ सुपर 12 मध्ये जातील. उद्या स्कॉटलंड विरुद्ध झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज विरुद्ध आयर्लंड असे सामने रंगणार आहेत.
हे देखील वाचा-