एक्स्प्लोर

पाकिस्तानचा अहमदाबादमध्ये खेळण्यास नकार, PCB मुळे विश्वचषकाचे वेळापत्रकही रखडले

World Cup 2023 scheduled : 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे, पण वेळापत्रकाचा पत्ता नाही.

ICC Cricket World Cup 2023 scheduled : भारतात होणाऱ्या विश्वचषकाला अवघे चार महिने उरलेत. पण बीसीसीआय अथवा आयसीसीने अद्याप वेळापत्रक जाहीर केलेले नाही. 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे, पण वेळापत्रकाचा पत्ता नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप फायनलवेळी (World Test Championship final 2023) बीसीसीआयने विश्वचषकाचे वेळापत्रक आयीसीला पाठवलेय. रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानने अहमदाबादमध्ये सामना खेळण्यास नकार दिल्यामुळे वेळापत्रकाला उशीर होत आहे. भारत आणि पाकिस्तान (India and Pakistan) यांच्यामध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये 15 ऑक्टोबर 2023 रोजी बीसीसीआयने सामना आयोजित केलाय. पाकिस्तानने अहमदाबादमध्ये खेळण्यास नकार दिलाय, त्यामुळे वेळापत्रक जाहीर होण्यास विलंब होत आहे.  ‘The Telegraph’ वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालय अहमदाबादमधील सुरक्षेबाबत सकारात्मक नाही. 

पाकिस्तान क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्यासाठी अद्याप पाकिस्तान सरकारकडून हिरवा कंदील मिळाला नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अर्थात पीसीबीने सर्व कागदपत्रे परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठवण्यात आली असून त्यावर निर्णय घेईल. सध्याची परिस्थिती पाहा पाकिस्तानच्या भारत दौऱ्याचा निर्णय सरकार घेईल, असे ‘The Telegraph’ने सुत्राच्या हवाल्याने वृत्त दिलेय. बीसीसीआयने ठरवलेल्या वेळापत्राकाबाबत अभ्यास करण्यासाठी पीसीबीला कालमर्यादा देण्यात आली आहे, त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.  विश्वचषकादरम्यानची भारतातील सुरक्षा आणि इतर समस्यांसंदर्भात परिस्थितीचा पीसीबीकडून आढावा घेण्यात येत आहे. त्याशिवाय इतर संस्थाही त्याबाबत विचार करत आहेत, असेही सुत्रांनी सांगितलेय. आयसीसीचे अधिकारी गेल्या महिन्यात लाहोर दौऱ्यावर आले होते, त्यावेळी पीसीबीने सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केल्याचे वृत्त आहे. विश्वचषकाचे अधिकृत वेळापत्रक WTC फायनलदरम्यान जाहीर केले जाणार होते, परंतु BCCI ने आशिया चषक 2023 साठी त्यांच्या 'हायब्रिड मॉडेल'ला सहमती दिल्याशिवाय PCB ने आक्षेप घेतलाय. 

आशिया चषकासाठी हायब्रिड मॉडेल -

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतर्गत कलहामुळे आशिया चषकाच्या तारखा आणि घोषणा रखडली होती.  अखेर आज आशियन क्रिकेट काऊन्सिलने आशिया चषकाची घोषणा केली आहे. आशिया चषकासाठी हायब्रिड मॉडेल वापरण्यात आलेय. पाकिस्तानमध्ये चार सामने होणार आहेत. तर उर्वरित सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत.  31 ऑगस्ट 2023 ते 17 सप्टेंबर 2023 यादरम्यान आशिया चषक रंगणार आहे.  भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्थान आणि नेपाळ या देशांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. 13 एकदिवसीय सामन्यानंतर आशियाचा किंग कोण ? यावरुन पडदा उठणार आहे. 

आणखी वाचा :

Asia Cup 2023 : मोठ्या वादावर पडदा, आशिया चषकाच्या तारखा ठरल्या, पाकिस्तानमध्ये भारत जाणार की नाही? अखेर निर्णय झाला!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेचे कोट्यवधी रुपये सुप्रिया सुळेंच्या खात्यावर वळवले, शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप
शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेचे कोट्यवधी रुपये सुप्रिया सुळेंच्या खात्यावर वळवले, शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप
Raigad Guardian Minister: रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेच्या आमदारांची फिल्डिंग, देवेंद्र फडणवीसांना भेटून सगळं पक्कं करणार
रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेच्या आमदारांची फिल्डिंग, देवेंद्र फडणवीसांना भेटून सगळं पक्कं करणार
राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार, मविआकडून एकही उमेदवारी अर्ज नाही
राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार, मविआकडून एकही उमेदवारी अर्ज नाही
Garud Puran: हिंदू धर्मात महिला स्मशानभूमीत का जात नाहीत? अनेकांना माहित नाही त्यामागचे कारण, गरुड पुराणात काय म्हटलंय?
हिंदू धर्मात महिला स्मशानभूमीत का जात नाहीत? अनेकांना माहित नाही त्यामागचे कारण, गरुड पुराणात काय म्हटलंय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 12 PM : 8 डिसेंबर 2024: ABP MajhaSharad Pawar Full Speech : लोकांना नको असताना निवडणूक आयोगाचा EVMसाठी हट्ट का ?Jayant Patil Markadwadi Speech : उत्तम जानकरांचा राजीनाम्याचा शब्द, जयंत पाटील म्हणतात..Chandrashekhar Bawankule : अपयश लपवण्याचं काम शरद पवार करताहेत - बावनकुळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेचे कोट्यवधी रुपये सुप्रिया सुळेंच्या खात्यावर वळवले, शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप
शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेचे कोट्यवधी रुपये सुप्रिया सुळेंच्या खात्यावर वळवले, शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप
Raigad Guardian Minister: रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेच्या आमदारांची फिल्डिंग, देवेंद्र फडणवीसांना भेटून सगळं पक्कं करणार
रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेच्या आमदारांची फिल्डिंग, देवेंद्र फडणवीसांना भेटून सगळं पक्कं करणार
राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार, मविआकडून एकही उमेदवारी अर्ज नाही
राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार, मविआकडून एकही उमेदवारी अर्ज नाही
Garud Puran: हिंदू धर्मात महिला स्मशानभूमीत का जात नाहीत? अनेकांना माहित नाही त्यामागचे कारण, गरुड पुराणात काय म्हटलंय?
हिंदू धर्मात महिला स्मशानभूमीत का जात नाहीत? अनेकांना माहित नाही त्यामागचे कारण, गरुड पुराणात काय म्हटलंय?
Vastu Tips : 'या' देवी-दैवतांचे फोटो घरात कधीच लावू नका; जाणून घ्या वास्तूशास्त्रानुसार याचा नेमका अर्थ
'या' देवी-दैवतांचे फोटो घरात कधीच लावू नका; जाणून घ्या वास्तूशास्त्रानुसार याचा नेमका अर्थ
Sharad Pawar : फडणवीसांनी वय काढत आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला, शरद पवारांचं मारकडवाडीतून चोख प्रत्युत्तर, म्हणाले, आम्हाला राजकारण...
फडणवीसांनी वय काढत आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला, शरद पवारांचं मारकडवाडीतून चोख प्रत्युत्तर, म्हणाले, आम्हाला राजकारण...
Nandurbar :गावातील दारूबंदीसाठी लाडक्या बहीणींचा पुढाकार; नंदुरबारच्या शहादा तालुक्यात थेट मतदान
गावातील दारूबंदीसाठी लाडक्या बहीणींचा पुढाकार; नंदुरबारच्या शहादा तालुक्यात थेट मतदान
cabinet expansion: एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड मागवून घेतलं, दोन नेते नापास; भरत गोगावलेंच्या मंत्रिपदाबाबत महत्त्वाची अपडेट
एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड मागवून घेतलं, दोन नेते नापास; भरत गोगावलेंच्या मंत्रिपदाबाबत महत्त्वाची अपडेट
Embed widget