PAK vs ENG T20 WC Final LIVE : टी20 विश्वचषक 2022 इंग्लंडच्या नावे, पाकिस्तानवर 5 विकेट्सनी मिळवला विजय
PAK vs ENG T20 World Cup 2022 Final LIVE Updates: ऑस्ट्रेलियातील मेलबर्नच्या मैदानावर पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात टी20 विश्वचषक 2022 चा अंतिम सामना खेळवला जात आहे.
LIVE
Background
T20 World Cup 2022 Final : पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (Pakistan vs England) यांच्यात आज टी-20 विश्वचषक 2022 चा अंतिम सामना खेळवला जात आहे. ज्यामुळे आजचा महामुकाबला जिंकणारा संघ यंदाचा विश्वचषक उंचावणार आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (Melbourne Cricket Ground) हा ऐतिहासिक सामना खेळवला जात आहे.
विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ सेमीफायनलमधून इंग्लंडकडून पराभूत होऊन स्पर्धेबाहेर गेला. ज्यामुळे इंग्लंड संघाने अंतिम फेरीत धडक घेतली, दुसरीकडे पाकिस्तान संघाची सुरुवात अत्यंत खराब होऊनही त्यांनी अखेरच्या सामन्यात दमदार खेळ दाखवत सेमीफायनलमध्ये धडक घेतली आणि सेमीमध्ये बलाढ्य न्यूझीलंडला मात देत फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. ज्यामुळे आज पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्त्वात पाकिस्तानी संघ विश्वचषकातील अंतिम लढत खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर जोस बटलर इंग्लंडचं नेतृत्त्व करणार आहे.
पाऊस आला तर...
आजच्या सामन्यात पाऊस व्यत्यय आणू शकतो, अशी माहिती समोर आली आहे. ऑस्ट्रेलियातील हवामान खात्याकडून रविवारी मेलबर्नमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, त्यामुळे अंतिम फेरीत पाऊस गोंधळ घालू शकतो. पण आयसीसीने आधीच याची काळजी घेतली असून सामन्यासाठी एक अतिरिक्त दिवस ठेवण्यात आला आहे. दरम्यान दुसऱ्या दिवशीही पावसाने व्यत्यय आणल्यास दोन्ही संघामध्ये 10 षटके खेळवली जातील. पण पावसामुळं दोन्ही दिवस खेळ झाला नाही तर, पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात ट्रॉफी विभागून दिली जाईल, असा आयसीसीचा नियम आहे.
कसे आहेत दोन्ही संघ-
पाकिस्तानचा संघ:
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदील शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, शान मसूद, फखर जमान, मोहम्मद हॅरीस
इंग्लंडचा संघ:
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, हॅरी ब्रूक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, फिलिप सॉल्ट, बेन स्टोक्स, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वूड, अॅलेक्स हेल्स, टायमल मिल्स.
हे देखील वाचा-