एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

T20 World Cup 2022: आयसीसीच्या सर्वोत्तम संघात विराट, सूर्याला स्थान; तर हार्दिकची 12वा खेळाडू म्हणून निवड

Most Valuable Team Of ICC Men's T20 World Cup 2022: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आसीसीसीनं (ICC) टी-20 विश्वचषकातील सर्वोत्तम संघाची घोषणा केलीय.

Most Valuable Team Of ICC Men's T20 World Cup 2022: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आसीसीसीनं (ICC) टी-20 विश्वचषकातील सर्वोत्तम संघाची घोषणा केलीय. या संघात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli), सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) समावेश करण्यात आलाय. तर, भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) 12वा खेळाडू म्हणून निवड करण्यात आलीय. दरम्यान, आयसीसीनं जाहीर केलेल्या टी-20 विश्वचषक 2022 मधील सर्वोत्तम संघ कसा आहे? हे जाणून घेऊयात.

टॉप ऑर्डर
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांची सलामीवीर म्हणून निवड करण्यात आलीय.  यानंतर विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघातही विराट तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येतो. या विश्वचषकात विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्यानं 6 डावात 98.67 च्या सरासरीनं 296 धावा केल्या आहेत.

मिडल ऑर्डर
चौथ्या क्रमांकावर असलेल्या सूर्यकुमार यादवपासून मधल्या फळीला सुरुवात होत आहे. या विश्वचषकात सूर्याची बॅट चांगलीच तळपल्याची आपण पाहिलं आहे. यानंतर पाचव्या क्रमांकावर या टी-20 विश्वचषकात शतक झळकावणाऱ्या ग्लेन फिलिप्सचा समावेश करण्यात आला. त्याचबरोबर झिम्बाब्वेचा ऑलराऊंडर खेळाडू सिकंदर रझा सहाव्या क्रमांकावर आहे. रझानं या स्पर्धेतील आठ डावांमध्ये 147.97 च्या स्ट्राइक रेटनं 219 धावा केल्या.

ऑलराऊंडर 
पाकिस्तानचा ऑलराऊंडर शादबा खानची सातव्या क्रमांकावर निवड झाली. शादाब खान या स्पर्धेत जबरदस्त लयीत दिसला. संपूर्ण स्पर्धेत त्याच्या बॅटमधून 98 धावा निघाल्या आणि गोलंदाजी करताना त्यानं 11 विकेट्स घेतल्या.

गोलंदाज
या संघात इंग्लंडचा ऑलराऊंडर आणि 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' सॅम करन आठव्या क्रमांकावर आहे. सॅम करननं या विश्वचषकात 11.38 च्या सरासरीनं एकूण 13 विकेट घेतल्या. यानंतर आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नोर्खिया नवव्या क्रमांकावर आहे. त्यानंतर इंग्लंड आणि टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात वेगवान गोलंदाज मार्क वूड दहाव्या क्रमांकावर आहे. तर, शाहीन आफ्रिदीला 11व्या क्रमांकावर ठेवण्यात आलंय. संघ इथेच संपला असला तरी हार्दिक पांड्याची 12वा खेळाडू म्हणून निवड करण्यात आलीय. 

टी-20 विश्वचषकातील सर्वोत्तम संघ-
एलेक्स हेल्स, जॉस बटलर, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ग्लेन फिलिप्स, सिकंदर रजा, शादाब खान, सॅम करन, एनरिक नॉर्खिया, मार्क वूड, शाहीन आफ्रिदी, हार्दिक पांड्या (12वां खिलाड़ी).

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pravin Darekar on CM : जनतेचा क्लिअर मॅनडेट देवेंद्र फडणवीसांना - प्रवीण दरेकरMaharashtra - Bhar Pattern : महाराष्ट्र बिहार पॅटर्न राबवेल का ?City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 25 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaMaharashtra Vidhan Sabha Giant Killers : दिग्गजांना हरवणारे जायंट किलर कोण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
Embed widget