एक्स्प्लोर

IND vs NZ : टीम इंडियाच्या विजयासाठी देव पाण्यात! सामन्याआधी धर्मशालेत पूजापाठ, आज भारत विरुद्ध न्यूझीलंड मुकाबला

World Cup 2023 : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) सामन्याआधी धर्मशाला मैदान आणि मंदिरात पूजा करण्यात आली असून टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना करण्यात आली आहे.

IND vs NZ, World Cup 2023 : आज धर्मशालेत (Dharmshala) भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) सामना रंगणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या नेतृत्वात भारतीय संघ (Team India) सलग पाचवा विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) सामना धर्मशाला स्टेडिअम (Dharmshala Stadium) वर दुपारी 2 वाजता पार पडणार आहे.  भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याआधी धर्मशालेत पूजा करण्यात आली आहे. टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनने आजच्या सामन्याच्या आधी पूजा केली आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याआधी धर्मशालेत पूजापाठ

हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनने भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याच्या आधी भगवान इंद्रूनाग पूजा केली आहे. या पूजेचं आयोजन धर्माशालेतील एका पौराणिक मंदिरात करण्यात आलं आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, इंडियन प्रीमियर लीगचे चेअरमन अरुण धूमल यांनीही या पूजेला उपस्थिती लावली. अरुण धूमल यांनी सांगितलं की, आम्ही पहिली पूजा येथे (धर्मशाला मैदान) केली आहे आणि दुसरी पूजा मंदिरामध्ये होणार आहे.

सामन्यावर पावसाचं सावट

महत्त्वाचं म्हणजे विश्वचषकासाठी धर्मशाला स्टेडिअमवर टी इंडियाचा हा पहिला सामना आहे. हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडिअम (Himachal Pradesh Cricket Stadium) मैदानावर दोन्ही संघ आपापसांत भिडणार आहेत. मात्र, चाहत्यांसाठी एक चिंतेची बाब म्हणजे आजच्या सामन्यावर पावसाचं सावट (Rain Prediction) आहे. आजच्या सामन्यात पावसामुळे व्यत्यय येऊ शकतो. अ‍ॅक्यू वेचरच्या रिपोर्टनुसार, धर्मशालेत पाऊस पडण्याची (Dharamshala Weather Update) शक्यता 40 टक्के आहे.

पाऊस पडल्यास सामन्यावर परिणाम

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे. सामन्यावर पावसाचा लक्षणीय परिणाम झाल्यास, षटके कमी केली जाऊ शकतात. जर सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. धर्मशाला येथे यापूर्वी झालेल्या सामन्यादरम्यान पाऊस पडला होता. शेवटचा सामना दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यात झाला. या सामन्यावरही पावसापरिणाम झाला. त्यामुळे षटके 43 षटकांपर्यंत कमी करण्यात आली.

भारत आणि न्यूझीलंडच्या संघांनी 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. दोन्ही संघानी विजयी कामगिरी कायम ठेवली आहे. दोन्ही संघांकडे प्रत्येकी 8-8 गुण आहेत. न्यूझीलंड पहिल्या क्रमांकावर तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जास्त रन रेटमुळे न्यूझीलंड अव्वल क्रमांकावर आहे.

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratnagiri News: ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या राजन साळवींना झटका, भाजपमुळे रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली
ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या राजन साळवींना झटका, भाजपमुळे रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली
बाईकवरुन जाताना गळ्यावर धारदार मांजा फिरला, मांसाचा लगदा बाहेर आला, छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यापाऱ्याचा गळा कापला
बाईकवरुन जाताना गळ्यावर धारदार मांजा फिरला, मांसाचा लगदा बाहेर आला, छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यापाऱ्याचा गळा कापला
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना भेटला, पंतप्रधान कार्यालयाचा सचिव असल्याचं सांगितलं, पण पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली अन्...
लग्नात देवेंद्र फडणवीसांच्यासमोर स्वत:चा सत्कार करुन घेतला, तितक्यात पोलिसांना संशय आला अन्...
Ind vs Sa 1st Test : टीम इंडियावरच 'तो' डाव उलटला, सामन्यापूर्वी गंभीर अन् पीच क्युरेटरच्या भांडणाची चर्चा, सौरव गांगुली संतापला, म्हणाला...
टीम इंडियावरच 'तो' डाव उलटला, सामन्यापूर्वी गंभीर अन् पीच क्युरेटरच्या भांडणाची चर्चा, सौरव गांगुली संतापला, म्हणाला...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray on Balasaheb Thackeray : उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेबांना अभिवादन
Mahapalikecha Mahasangram : काय आहेत Mira Bhayandar च्या समस्या?; ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या काय?
Mahapalikecha Mahasangram Kalyan-Dombivliआश्वासन नको,कामं करणारे नेते हवे,नागरिक संतप्त;कोणाची बाजी?
Mahapalikecha Mahasangram Navi Mumbaiमध्ये पालिकेत 5 वर्षांपासून प्रशासक,मात्र काम होत नसल्याचा आरोप
Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमधील मतदारांना 50 टक्क्यात वस्तूंचं आमिष, जावळेंकडून मतदारांना आमिष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri News: ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या राजन साळवींना झटका, भाजपमुळे रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली
ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या राजन साळवींना झटका, भाजपमुळे रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली
बाईकवरुन जाताना गळ्यावर धारदार मांजा फिरला, मांसाचा लगदा बाहेर आला, छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यापाऱ्याचा गळा कापला
बाईकवरुन जाताना गळ्यावर धारदार मांजा फिरला, मांसाचा लगदा बाहेर आला, छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यापाऱ्याचा गळा कापला
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना भेटला, पंतप्रधान कार्यालयाचा सचिव असल्याचं सांगितलं, पण पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली अन्...
लग्नात देवेंद्र फडणवीसांच्यासमोर स्वत:चा सत्कार करुन घेतला, तितक्यात पोलिसांना संशय आला अन्...
Ind vs Sa 1st Test : टीम इंडियावरच 'तो' डाव उलटला, सामन्यापूर्वी गंभीर अन् पीच क्युरेटरच्या भांडणाची चर्चा, सौरव गांगुली संतापला, म्हणाला...
टीम इंडियावरच 'तो' डाव उलटला, सामन्यापूर्वी गंभीर अन् पीच क्युरेटरच्या भांडणाची चर्चा, सौरव गांगुली संतापला, म्हणाला...
IND vs PAK Asia Cup Rising Stars: कॅच पकडूनही नॉट-आउट दिले, सगळे अंपायरच्या अंगावर धावले, नको नको ते बोलले; भारत-पाकिस्तानच्या सामन्यात कधीही न पाहिलेला राडा!
कॅच पकडूनही नॉट-आउट दिले, सगळे अंपायरच्या अंगावर धावले, नको नको ते बोलले; भारत-पाकिस्तानच्या सामन्यात कधीही न पाहिलेला राडा!
Saudi Arabia Accident: सौदी अरेबियात बसचा भीषण अपघात, 42 भारतीयांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची शक्यता
सौदी अरेबियात बसचा भीषण अपघात, 42 भारतीयांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची शक्यता
Sanjay Raut: दुर्धर आजारानंतरही संजय राऊतांमधील शिवसैनिक जागा झाला, मास्क लावून घराबाहेर पडले, स्मृतीस्थळ गाठून बाळासाहेबांना वंदन!
दुर्धर आजारानंतरही संजय राऊतांमधील शिवसैनिक जागा झाला, मास्क लावून घराबाहेर पडले, स्मृतीस्थळ गाठून बाळासाहेबांना वंदन!
Mahesh Babu Son Gautam: महेश बाबू, नम्रता शिरोडकरच्या लेकाला पाहिलंत? अगदी वडिलांची कार्बन कॉपी, विश्वास बसत नसेल, तर तुम्हीच पाहा!
महेश बाबू, नम्रता शिरोडकरच्या लेकाला पाहिलंत? अगदी वडिलांची कार्बन कॉपी, विश्वास बसत नसेल, तर तुम्हीच पाहा!
Embed widget