एक्स्प्लोर

फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा

स्थानिक आघाडीतून बाहेर पडत असल्याचे एमआयएमचे पत्र 'एबीपी माझा'च्या हाती आले असू पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष युसूफ पुंजांनींनी हे पत्र दिले आहे.

अकोला : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी युती आणि आघाडी अंबरनाथ नगरपालिका आणि अकोल नगरपालिकेत झाली होती. मात्र, याबाबत वरिष्ठांना समजताच भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे, संबंधित स्थानिक नेत्यांकडून ही युती मागे घेतली जात असल्याचंही पाहायला मिळालं. अकोला जिल्ह्यात भाजप आणि एमआयएम (MIM) यांच्यात युती झाली होती. मात्र, आता एमआयएम अकोटमधील (Akola) भाजपच्या नेतृत्वाखालील 'अकोट विकास मंचा'तून बाहेर पडले आहे. तर, भाजप (BJP) प्रदेशाध्यक्षांकडूनही विधानसभा आमदार प्रकाश भरसाखळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर, अंबरनाथमधील भाजप नेते नरेंद्र पवार यांनी ही युती नसून काँग्रेसने भाजपला विकासासाठी समर्थन दिले आहे, तरीही पक्षाचा आदेश आम्हाला मान्य आहे, असे स्पष्टीकरण दिलं.

स्थानिक आघाडीतून बाहेर पडत असल्याचे एमआयएमचे पत्र 'एबीपी माझा'च्या हाती आले असू पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष युसूफ पुंजांनींनी हे पत्र दिले आहे. त्यानुसार, एमआयएमच्या अकोट नगरपालिकेतील पाचही नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी भाजपसमवेतच्या आघाडीतून बाहेर पडत असल्याचे पत्र दिले. अकोट नगरपालिकेत हिंदुत्वाच्या बाता करणाऱ्या भाजपची 'एमआयएम'शी आघाडी झाली होती. नगरपालिकेत बहुमत नसलेल्या भाजपने 5 नगरसेवक असलेल्या 'एमआयएम'ला घेतले सोबत होते. मात्र, भाजप नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही युती मान्य नसल्याचे सांगत कारवाईचा इशारा दिला होता. त्यानुसार, भाजपकडून कारवाईला सुरुवात झाली आहे. आता, एमआयएम'नेही भाजपला दिलेलं समर्थन मागे घेतले. भाजपने स्थापन केलेल्या 'अकोट विकास मंचा'त एमआयएम दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी आणि बच्चू कडूंची 'प्रहार जनशक्ती पार्टी सहभागी झाली होती. मात्र, आता या युतीमधून एमआयएम बाहेर पडलं आहे.

भाजपकडून कारणे दाखवा नोटीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काँग्रेस आणि एमआयएम समवेत झालेल्या युतीवरुन कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर, अकोट येथील एमआयएमच्या युतीच्या संदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्षांनी कडक पाऊल उचलले आहे. येथील विधानसभा आमदार प्रकाश भरसाखळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ‘पक्षाची प्रतिमा मलिन झाली, आपल्यावर कारवाई का करण्यात येऊ नये?’ असे भाजप प्रदेशाध्यक्षांनी पत्रातून विचारले आहे. त्यामुळे, आता भाजप नेते यावर काय खुलासा देणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भाजपच्या आघाडीतून बाहेर पडलेले एमआयएमचे पाच नगरसेवक :

1) रेश्मा परवीन मोहम्मंद अजीम

2) युसुफ खान हादीक खान -

3) हन्नान शाह सुलतान शाह-

4) दिलशाद बी रज्जाक खाँ -

5) अफरीन अंजुम मो. शरीफोद्दीन

हेही वाचा

काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
Raju Shetti on Gokul Election: 'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली
'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली!

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Devendra Fadnavis: पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार? तरीही चौकशीसाठी तयार : देवेंद्र फडणवीस
पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार? तरीही चौकशीसाठी तयार : देवेंद्र फडणवीस
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
Nobel Peace Prize : डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा म्हणून शिफारस करणाऱ्या पाकिस्तानची फजिती, शहबाझ शरीफ यांचा अपेक्षाभंग
ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा म्हणून शिफारस करणाऱ्या पाकिस्तानची फजिती, शहबाझ शरीफ यांचा अपेक्षाभंग
Delhi CJP Protest: 'माशा मारण्यासाठी हातोड्याचा वापर करू नका..' सीजेपी आंदोलनापूर्वी देशव्यापी रेल्वेगाड्या, मेट्रो बंदीच्या फतव्यावर सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला फटकार
'माशा मारण्यासाठी हातोड्याचा वापर करू नका..' सीजेपी आंदोलनापूर्वी देशव्यापी रेल्वेगाड्या, मेट्रो बंदीच्या फतव्यावर सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला फटकार
Embed widget